Chh. Sambhajinagari Negar : एकीकडे अवेळी व मान्सूनपूर्व पाऊस खरीपपूर्व शेती मशागत किंवा काढणीला आलेल्या पिकासाठी बाधक ठरला. मात्र हाच पाऊस रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र पथ्यावर पडल्याची स्थिती आहे. या पावसामुळे दरवर्षी घेत असलेल्या रेशीम कोष उत्पादनाच्या बॅचमध्ये एक ते दोन संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात मराठवाडा रेशीम कोष उत्पादकांचा हब मानला जातो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर अशा क्रमाने रेशीम उद्योगाचा मराठवाड्यातील विस्तार आहे. कोरडवाहू, हंगामी व पूर्ण बागायती अशा प्रकारे रेशीम कोष उत्पादक रेशीम उद्योग करतात. दरवर्षी त्यासाठी महरेशीम अभियानाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी मोहीम राबविल्या जाते.
पूर्व मोसमी किंवा अवेळी पाऊस न आल्यास महा रेशीम अभियानातून नोंदणी झालेल्या तुती लागवडीसाठी जुलै किंवा ऑगस्ट उजाडतो. यंदा मात्र महारेशीम अभियानातून नोंदणी झालेल्या किंवा रेशीम उद्योगाकडे वळू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जूनमध्येच तुती लागवडीची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.
काही शेतकरी २५ मेनंतर छाटणी करतात. यंदा मात्र त्या आधीपासूनच पाऊस सुरू झाल्याने छाटणीची संधी हुकून शेतकऱ्यांना एक ते दीड फुटापर्यंत पाला उपलब्ध झाला आहे. या उपलब्ध पाण्याच्या भरवशावर एरवी जुलैच्या शेवटी मॅच सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना जूनच्या शेवटीच पहिली बॅच सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मॉन्सूनचेही आगमन पाठोपाठ होण्याची संकेत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याची एक बॅच व एकूण वर्षात घेतल्या जाणाऱ्या बॅचमध्ये एक ते दोन बॅचची वाढ शेतकऱ्यांना करता येणार असल्याचे शेतकरी सांगतात.
उन्हाळा लांबला असता आणि उन्हाची तीव्रता वाढली असती तर छाटणी न केलेल्या तुती बागा काही प्रमाणात जळण्याची किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तूट येण्याची शक्यता होती. ती शक्यताही यंदा बऱ्यापैकी कमी होण्याचा अंदाज जाणकार शेतकरी व तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.-ज्ञानदेव ढाकणे, रेशीम कोष उत्पादक, देवगाव.
मागच्या वर्षी चार बॅच घेतल्या होत्या. मार्चला छाटणी केलीच नव्हती आता बऱ्याच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे एक ते दीड फूट पाला तयार झाला आहे. २० जूननंतर पहिली बॅच सुरू होईल त्यासाठी तयारी करतोय.बळीराम गीते, रेशीम कोष उत्पादक, देवगाव.
वर्षातून चार ते पाच बॅच घेत असतो. जुलैच्या शेवटी साधारणपणे पहिली बॅच सुरू होते यंदा मात्र १५ जूननंतर पहिली बॅच सुरू होईल. म्हणजे माझ्या वर्षभरातील एकूण बॅचमध्ये एकची भर पडेल.-ज्ञानदेव ढाकणे, रेशीम कोष उत्पादक, देवगाव.
उन्हाळा दीर्घकाळ टिकला असता तर तुतीमधील तूट वाढली असती. ते संकट आता टळली आहे. छाटणी न केलेल्यांनी एक बॅच घेतल्यानंतर छाटणी करावी. इतर शेतकरी आता छाटणी करू शकतात.अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर व जालना.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.