Electricity Maintainance Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Maintainance Work : महावितरणकडून मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग

Team Agrowon

Akola News : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या तडाक्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र वीज यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीसह वीज वाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे अशा प्रकारच्या कामांचा यात समावेश आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण करण्यात आले आहे.

कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. मागील काही महिन्यांपासून अकोल्यासह संपूर्ण विदर्भात गाची लाही लाही करणारे तापमान आहे. त्यातच अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.

वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. या फांद्या काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने या फांद्या छाटण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स बॅनर्स, प्लॉस्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो, यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत

सहकार्य करा : कछोट

वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडीत, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहेत. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT