Mahabeej Buldhana agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात ‘महाबीज’मार्फत खरीपपूर्व शेती कार्यशाळा

Soybean Seed Germination Process : सोयाबीन बियाण्याची बीजप्रक्रिया, पेरणीची खोली व किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी या चतुःसूत्रीचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

Team Agrowon

Mahabeej Buldhana Office : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बुलडाणा कार्यालय व मेहकर कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने चायगाव येथे खरीप हंगामपूर्व शेती कार्यशाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, पीक, नवीन वाण तसेच जैविक उत्पादने व त्याचा शेतीमध्ये उपयोग याबद्दल माहिती देण्यासाठी शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ होते. मार्गदर्शक म्हणून ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बदलत्या हवामानानुसार, जमिनीच्या मगदुरानुसार, सोयाबीन व तूर पीक वाणाचे महाबीजचे प्रमाणित बियाणे निवड, जैविक खते व बुरशी नाशकांचे वापर व फायदे या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

सोयाबीन बियाण्याची बीजप्रक्रिया, पेरणीची खोली व किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी या चतुःसूत्रीचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना सांगितले. हिरवळीचे खत, विविध भाजीपाला पिके, चारा पिके, केळी, पपई इत्यादींची माहिती दिली. बाजारातून बियाणे खरेदी करताना क्यूआर कोड असलेली म्हणजेच प्रमाणित बियाणे असलेली बॅगच खरेदी करा, असेही शेतकऱ्यांना सांगितले.

कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे यांनी शेतकऱ्यांना जमीन, हवामान व वातावरणानुसार सोयाबीन वाणाची निवड तसेच उगवणशक्ती तपासणी व बीज प्रक्रियेची माहिती दिली. सूत्रसंचालन कृषी क्षेत्र अधिकारी श्री. पराते यांनी केले. के. बी. राठोड यांनी बीजोत्पादन कार्यक्रमाविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी कृषी विभागातील तंत्र अधिकारी विजय सरोदे, प्रभाकर देशमुख, जितेश देशमुख व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी निखिल चनखोरे, संकेत सदावर्ते यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT