Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्न कायम

Agriculture Pump : जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवे वीज संयोजन मागणीचे प्रस्ताव गेले अनेक महिने रखडले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे विजेची उपलब्धता, दुष्काळी भागातील अतिपाणी उपसा अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवे वीज संयोजन कृषिपंपांना दिले जात नसल्याची माहिती आहे.

जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवे वीज संयोजन मागणीचे प्रस्ताव गेले अनेक महिने रखडले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे काी वर्षांपूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांनादेखील वीज संयोजन मिळत नसल्याची स्थिती होती.

ही समस्या मोठा पाठपुरावा केल्यानंतर काही भागात मार्गी लागली, पण काही भागात ही समस्या कायम आहे. जळगाव जिल्ह्यात या विहिरींचे सुमारे अनेक प्रस्ताव रखडल्याचे सांगण्यात आले. इतर शेतकरीदेखील आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात.

परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवे संयोजन जोडता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील मंडळी करते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांच्याकडे पाठपुरावा शेतकरी करीत आहेत. परंतु वीज वितरण कंपनीची मंडळी लोकप्रतिनिधींचेदेखील एेकत नाही. ज्या भागात दुष्काळ होाता, त्या भागात अतिउपसा करणे कायद्याने योग्य नाही. २०० फुटांपेक्षा अधिक खोल कूपनलिकांना वीज संयोजन देणार नाही, असे वीज कंपनीमधील कर्मचारी सांगतात. यामुळे हा प्रश्न रखडत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

समस्यांची दखल अधिकारी घेणार का?

कृषिपंपासंदर्भातील समस्येची दखल घ्यायला अधिकारी तयार नाहीत.

वीज कंपनीच्या कार्यालयात सुट्ट्यांची चढाओढ सुरू असते.

यात अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत.

अधिकारी भेटण्यास नकार देतात.

यामुळे शेतकरी कूपनलिका किंवा विहिरीला वीज संयोजन नसल्याने घेऊ शकले नाहीत.

ही स्थिती रब्बी हंगामातही असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT