Electricity Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : वीजचोर आता महावितरणच्या रडारवर

Electricity Thieves : वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात मोहीम उघडण्यात आली असून, यात महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Akola News : वीज चोरी विरोधात अकोला परिमंडळात मोहीम उघडण्यात आली असून, यात महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत. आगामी तीन महिने सतत चालणाऱ्या या मोहिमत महावितरणकडून थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता यांनी दिली आहे.

कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकित वीज गळती व वीजहानी विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. वितरण हानी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

त्यामुळे आगामी काळात परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत महावितरणतर्फे वीज चोरीविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत, फॉल्टी मीटर, सरासरी वीजबिल, शून्य युनिटचे बिल, अत्यल्प वीज वापर अशा सर्वच ग्राहकांची तपासणी करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.

सवलत देऊनही अभय योजनेत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले जे ग्राहक सहभागी झालेले नाहीत व त्यांनी पुनर्जोडणी घेतलेली नाही अशा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या सर्वच ग्राहकाची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे.

या मोहिमेत वीज जोडणीच्या ठिकाणी अवैधपणे आढळणाऱ्या वीज पुरवठ्याविरुद्ध विद्युत कायदा २००३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच थकबाकी असलेल्या ठिकाणी शेजाऱ्यांकडून अनाधिकृत वीज जोडणी देण्यात आली असेल, तर त्या शेजारी ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे. वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर मर्यादेपलीकडे भार पडतो आहे.

शेजारधर्म पाळणाऱ्यांवर कारवाई

थकित वीजबिलामुळे एखाद्या ग्राहकाची जोडणी कायम तोडली असेल आणि त्याला शेजारी वीज जोडणी देत असेल तर अशा ग्राहकाविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये या धडक मोहिमेने खळबळ उडवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT