Tissue Culture Banana Plants Agrowon
ॲग्रो विशेष

Power Tarrif Hike: वीज दरवाढीची टिश्यू कल्चर कंपन्यांना धास्ती

Tissue Culture Company Issue: महावितरणने कृषी इतर वीज दरात २८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवल्याने याचा मोठा फटका टिश्‍यू कल्चर केळी रोपे तयार करणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: महावितरणने कृषी इतर वीज दरात २८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवल्याने याचा मोठा फटका टिश्‍यू कल्चर केळी रोपे तयार करणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे. ही वीज दरवाढ लादल्यास टिश्‍यू कल्चरची रोपे महाग होण्याची शक्यता आहे. राज्यात ५० पैकी ३० कंपन्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना आता या वीज दरवाढीने त्यांचे कंबरडेच मोडणार आहे. यामुळे एक रोप २२ ते २५ रुपये होण्याची शक्यता असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

सध्या टिश्‍यू कल्चर लॅबना प्रति युनिट साडेसात ते पावणेआठ रुपये प्रति युनिट याप्रमाणे वीज दर आकारला जातो. दरवाढ झाल्यास हा दर अकरा रुपयांपर्यंत जाणार आहे. नुकताच महावितरणने वीज नियामक आयोगाकडे पंचवार्षिक वीजदर वाढीचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये सर्वात जास्त दरवाढ ही कृषी इतर या वर्गवारीची केलेली आहे.

कृषी इतरची २८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे महावितरण दिलेला आहे. बाकी सर्व कॅटेगरीपेक्षा सर्वात जास्त दरवाढ ही कृषी इतर या वर्गवारीची केलेली आहे. दोन वर्षांपूर्वी या कृषी इतर वर्गासाठी अगोदरच ३६ टक्के दरवाढ आयोगाकडून महावितरणने मंजूर करून घेतली घेतली होती, त्यात अजून नव्याने २८ टक्के दरवाढीचा आघात या वर्गवारी वर केला आहे.

देशभरात सर्वांत चांगल्या टिश्‍यू कल्चर रोपांच्या गुणवत्तेसाठी महाराष्ट्राचे नाव प्रसिद्ध आहे. देशभरातील एकूण टिश्‍यू कल्चर रोपांच्या पुरवठ्यापैकी साधारण २५ कोटी रोपे ही एकट्या महाराष्ट्रात तयार होतात. याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होतो. महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच टिश्‍यू कल्चर कंपन्यांना कृषी दराने वीजपुरवठा केला जातो. मात्र महावितरणने हळूहळू प्रत्येक वीज दरवाढीवेळी या वर्गवारीची जवळपास आता इंडस्ट्रियल दराने वीज घेण्यास या उद्योगाला भाग पाडण्याचे ठरवले आहे.

या कंपन्यांना सवलतीचा वीजदर असल्याने या कंपन्या परवडणाऱ्या दरात म्हणजे किमान १५ ते १६ रुपये प्रतिरोप या दराने रोपांची विक्री करत होत्या. मात्र आत्ताची दरवाढ लागू झाली तर उत्पादन खर्च वाढल्याने किमान २२ ते २५ रुपये या दराने रोपे खरेदी करावी लागू शकतात. महाराष्ट्रात सुमारे ५० टिश्‍यू कल्चर कंपनी कार्यरत आहेत. मात्र आता ही सवलत हिरावून घेण्याचा घाट आखला जात आहे.

कोर्टात केसेस करण्यास भाग पाडले : अक्षय पाटील

असोसिएशन ऑफ टिश्‍यू कल्चर इंडस्ट्रीज महाराष्ट्राचे अध्यक्ष अक्षय पाटील यांनी सांगितले, की सुरुवातीपासूनच महावितरणची याबाबत तिरकस भूमिका आहे. महाराष्ट्रातील टिश्‍यू कल्चर कंपन्यांना त्यांनी पहिल्यापासून टारगेट बनवले आहे. सवलतीचा दर होता तेव्हा पण कंपन्यांना इंडस्ट्रियल दराने वीज आकारणी करून महावितरणच्या कोर्टात केसेस करण्यास भाग पाडले आहे. टिश्‍यू कल्चर पूर्ण ॲक्टिव्हिटीची वर्गवारी बदलून कृषी पंपाच्या वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्याची असोसिएशनची मागणी आहे. याबाबत लागणारी सर्व कागदपत्रे आम्ही जन सुनावणी वेळी आयोगासमोर सादर करू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT