Latur Green Festival : लातूरच्या हरितोत्सवात लाखो रोपांची विक्री

Tree Plantation : वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १४) आयोजित हरितोत्सवाला लातूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
Latur Green Festival
Latur Green FestivalAgrowon
Published on
Updated on

Latur News : वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १४) आयोजित हरितोत्सवाला लातूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यानिमित्त उभारलेल्या स्टॉलमधून नागरिकांनी लाखो रोपांची खरेदी केली. भर पावसात दिवसभर नागरिकांकडून विविध प्रजातींच्या रोपांची खरेदी सुरू होती.

या वेळी बालकांनी वृक्षदिंडीतून ‘एक एक झाड लावू ममतेनं, फुलवूया रान सारं हिमतीनं’, असा संदेश दिला. तर दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर करत हरितोत्सवात चांगलाच रंग भरला. बालकांची फळझाडांना, गृहिणींची औषधी व फुलझाडांच्या रोपांना पसंती होती.

Latur Green Festival
Tree Plantation : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ उपक्रमातून होणार वृक्षलागवड

हरितोत्सवात खासगी रोपवाटिकांचे १८, बचत गटाचे सात, बियाणे बँकेचा एक, वनविभागाचे तीन, कृषी विभागाचे दोन व सामाजिक वनीकरणाचा एक असे ३१ स्टॉल होते. गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात रोपांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल होते. यामध्ये औषधी वनस्पती, शोभेची झाडे, परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे, फळझाडे व फुलझाडांची रोपे, वृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खते, कुंड्या व इतर आवश्यक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी महिला बचतगटांचे सात स्टॉल होते.

Latur Green Festival
Tree Plantation : दहा लाख झाडे लावणार

जिल्हाधिकाऱ्यांकडून वृक्षप्रेमींशी संवाद

हरितोत्सवात सहभागी नागरिक व महिलांसोबत जिल्हाधिकारी वर्षा घूगे ठाकूर यांनी संवाद साधून वृक्ष लागवडीतील सहभागाचे कौतुक केले.या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, सहआयुक्त रामदास कोकरे, आर. एन. काळे,

उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, रोहिणी नऱ्हे, विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे, उपायुक्त शुभम क्यातमवार, परवीन पठाण, मधुकर ढमाले, सतीश नरहरे, डॉ. संदीपान जगदाळे यांच्यासह ग्रीन लातूर संघटना, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष टीम आदी पर्यावरण संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com