Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Dues : महावितरणची थकबाकी पोहोचली १५६ कोटींवर

Power Bill Recovery : महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलाच्या महसुलावरच अवलंबून आहे. परंतु मार्च २०२५ नंतर प्रत्येक महिन्यात अपेक्षित महसुलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसुली झालेली नाही.

Team Agrowon

Amaravati News : परिमंडळात वीजबिलाची थकबाकी कमी न होता दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मार्च २०२५ मध्ये असलेली ७५ कोटींच्या थकबाकीत वाढ होऊन जुलै २०२५ मध्ये १५६ कोटी झाली आहे.

त्यामुळे वीज बिलाच्या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता ते जनमित्र सर्वांना ग्राहकनिहाय थकीत वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांनी दिली आहे.

महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलाच्या महसुलावरच अवलंबून आहे. परंतु मार्च २०२५ नंतर प्रत्येक महिन्यात अपेक्षित महसुलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसुली झालेली नाही. त्यामुळे थकबाकी कमी न होता त्यात वाढ झाली आहे.

ही गंभीर बाब असून महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसुलीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे थकबाकी आणि चालू वीजबिलाच्या वसुलीवर परिणाम होत असेल तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परिमंडळात विविध वर्गवारीतील ३ लाख ८१ हजार ४०६ ग्राहकांकडे असलेल्या १५६ कोटी रुपयांच्या थकीत रकमेत अमरावती जिल्ह्यातील १ लाख ९०९३६ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ६७ कोटी ३९ लाख रुपयांचे आणि यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ९०४७० ग्राहकांकडे ८८ कोटी ८१ लाख रुपयांची वीजदेयके थकली आहेत.

तसेच परिमंडळात एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या ११५७ असून त्यांच्याकडे ३२ कोटी ६७ लाख रुपये थकीत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४७२ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ६५५ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे अनुक्रमे १४.१७ कोटी व १८.५५ कोटी थकीत आहेत.

थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर उतरले आहेत तसेच आगामी दिवस हे सणासुदीचे असल्याने महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी आणि वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पाऊस होणार; हवामान विभागाचा अंदाज

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT