
Chh. Sambhajinagar News : महावितरणच्या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात ५ हजार ७६, ग्रामीण मंडलात ४ हजार १९ व जालना मंडलात ८ हजार ८९५ अशा एकूण १७ हजार ९९० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २९, ३० व ३१ मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. तसेच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहे.
आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. थकबाकीसह चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी ३० व ३१ मार्च रोजी (रविवार व सोमवार) वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे.
ही कटू कारवाई, तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. तसेच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे.
ऑनलाइन बिल भरा, व्हा लकी
ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. वीजबिल भरणा केलेली रक्कम किमान १०० रुपयांच्यावर असायला हवी.
लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम १० रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र राहील. ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रक्कमेत ०.२५ टक्के सवलतही दिली जाते.
'गो-ग्रीन'द्वारे १२० रुपयांची सूट
ग्राहकांना छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' योजनेत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑफलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांनी पहिल्यांदाच ऑनलाइन बिल भरल्यावर त्यांना स्क्रीनवर गो-ग्रीनची पॉप-अप दिसणार आहे. गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एकरकमी १२० रुपये सूट दिली जाईल. गो-ग्रीनमध्ये पुढील प्रत्येक बिल ग्राहकाला ई-मेल व मोबाईलवर मिळेल. त्यामुळे ग्राहकाला एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटही मिळवता
येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.