Muskmelon Food Agrowon
ॲग्रो विशेष

Muskmelon Processing : खरबूजापासून बनवुयात पावडर, जेली व सिरप.

Muskmelon Processed Food : खरबूजापासून बनवलेल्या विविध पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. खरबूज, जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश या विविध प्रक्रियायुक्त पदार्थाची निर्मिती करता येऊ शकते.

Team Agrowon

व्ही.आर.चव्हाण, डॉ.एन.आर.चव्हाण

Production of Muskmelon Processed Food : खरबूज हे सुगंध आणि गोड चव असणारे फळ आहे. परिपक्व फळात साखर जास्त प्रमाणात असते. फळ पौष्टिक असून आणि औषधी गुणधर्मांनीयुक्त आहे. जीवनसत्त्व अ,क,बी ६ आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ साठवले जाऊ शकत नाही.

फळाचे मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात केल्यास ते टिकवून ठेवण्यात मदत होते. खरबूजापासून बनवलेल्या विविध पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. खरबूज, जॅम, जेली, गर, सरबत, स्क्वॅश या विविध प्रक्रियायुक्त पदार्थाची निर्मिती करता येऊ शकते.

फायदे

हे फळ खाल्ल्यास रक्तदाब व्यवस्थित करण्यात मदत होते, कारण त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते जे रक्तवाहिन्यांना आराम करण्यास आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते.

जीवनसत्त्व क जास्त प्रमाणात असल्यामुळे, रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत होते. वजन कमी होण्यास मदत होते.

फळात कॅलरी कमी आणि तंतूमय घटक जास्त आहेत. शिवाय जीवनसत्त्व अ जास्त प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असल्याने त्वचेसाठी खरबूज फायदेशीर आहे.

प्रक्रिया पदार्थ

पावडर

चांगली निवडलेल्या फळे स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकू वापरून साल काढावी.

सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून त्याचा गर करून घ्यावा.

गर मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. नंतर हा गर स्प्रे ड्रायर किंवा कन्व्हेंशनल ड्रायर वापरून वाळवावा. तयार पावडर प्लास्टिकच्या पिशवीत साठवावी.

सरबत

चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढावी. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून गर करून घ्यावा.

दहा टक्के खरबूज गर आणि १० टक्के टीएसएस (साखर) असते तसेच ०.१ -०.३ टक्के आम्ल असते. एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो साखर आणि १ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे. थंड केलेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.

जेली

चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढावी. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून गर करून घ्यावा.

निवळलेल्या स्वच्छ रसापासून जेली तयार करण्यापूर्वी त्याची पेक्‍टीनसाठी परीक्षा करावी. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात रस वजन करून घ्यावा. त्यातील पेक्‍टीनच्या प्रमाणानुसार प्रति किलोस एक किलो (जास्त पेक्‍टीन असेल तर) किंवा तीन-चार किलो (पेक्‍टीन कमी असेल तर) साखर मिसळावी. नंतर हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट होण्यास सुरवात झाल्यानंतर परीक्षण करावे.

तयार झालेल्या जेलीमधील एकूण विद्राव्य घटक रिफ्रॅक्‍टोमीटरच्या साह्याने मोजल्यास ६७ अंश ब्रिक्‍सच्या वर गेले तर जेली तयार झाली असे समजावे.

जेली तयार झाल्यावर ती गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या कोरड्या रुंद तोंडाच्या बाटलीत भरावी. बाटली व्यवस्थित

हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावी.

सिरप

चांगली निवडलेली फळे स्वच्छ पाण्यात धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढावी. सोललेली फळे दोन भागात अर्धवट कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्याचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून गर करून घ्यावा.

५०० मिलि गरामध्ये २५० ग्रॅम साखर आणि १० मिलि लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण साखर विरघळण्यासाठी उकळावे. उकळलेले मिश्रण सुती कापडातून गाळून सिरप प्लॅस्टिक

बाटलीमध्ये भरून रेफ्रिजरेटरमध्ये साठवावे.

व्ही.आर.चव्हाण, ९४०४३२२६२३

(एम.जी.एम.अन्नतंत्र महाविद्यालय,गांधेली,छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT