Jalgaon News: खानदेशात पाऊसमान कमी आहे. यामुळे कांदा, कलिंगड, केळी लागवडीस पुढे फटका बसू शकतो. तसेच अन्य भाजीपाला पिकांच्या शेतीसमोरही अडचणी तयार होतील, अशी स्थिती आहे. .खानदेशातील अनेक गावे बोर, पपई, कलिंगड, वांगी, टोमॅटो, केळी, काकडी, खरबूज, भेंडी आदींसह विविध भाजीपाला, फळबागांसाठी अग्रेसर आहेत. पण यंदा पाऊस कमी आहे. धुळे जिल्ह्यातील काही गावांत यंदा एकाही शेतात फळबाग नाही. तलाव, बंधाऱ्यांसह विहिरी व कूपनलिका आटत आहेत. त्यामुळे शेतीतील उलाढाल कमी होईल, असे दिसत आहे..Rain Deficit : पावसाची तूट पिकांच्या मुळांवर, कोरडवाहू शेतीपुढे संकट.अनेक गावांत श्रमदानातून दोनशेहून अधिक बंधारे बांधून पाणी अडविले. पण पाऊस नाही. जो जलसाठा आहे, त्यातून वापर सुरू आहे. पुढे जलसाठे आटतील. काही तलाव कोरडे होत आहेत. त्यात पाण्याची आवक नसल्याने अडचणी आहेत..प्रशासनावर ताण शक्यपाणीटंचाईप्रश्नी उपाययोजना म्हणून कूपनलिका तयार करण्याची गरज भासणार आहे. कारण पुढे पाणीटंचाई तयार होईल. सार्वजनिक विहिरीत पाणी आटू लागले आहे. टंचाई काहीशी कमी झाली होती, पण ही समस्या आणखी पुढे डोके वर काढेल, अशी शक्यता आहे..Rain Deficit : कमी पावसामुळे खरिपाचे नुकसान.माळरान होतेय उजाडअनेक गावांत माळरानातील हिरवळ कमी होत आहे. कारण पाऊस नाही. पावसाळ्यात टेकड्यातून वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून अनेक गावांत ग्रामस्थांनी श्रमदान करून बंधारे बांधले. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत पाटबंधारे विभागानेही त्यात काहीशी भर घातल्याने काम जोमात झाले आहे. पण त्यात पाणी नाही. शेकडो शेततळीदेखील कोरडी आहेत. त्यामुळे दुष्काळात विहिरीत पाण्याची उपलब्धता कशी राहील, अशी चिंता आहे. यंदा प्रथमच निसर्गाची वक्रदृष्टी अनेक गावांत पडली आहे. .काही गावांत ९० टक्के शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घेतला असून, पपई, बोर, डाळिंब, केळी, ऊस, सीताफळ आदींची लागवड केली. पण या बागा कशा जगवायच्या, असा प्रश्न आहे. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर आदी भागातील पपईची शेतीही धोक्यात येत आहे. पाण्याची काटकसर शेतकरी करीत आहेत. उष्णता वाढल्याने संकट अधिकचे गंभीर बनत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.