Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : बटाटा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

Potato Cultivation : पावसामुळे बटाटा लागवडीची कामे येत्या दोन तीन- दिवसांत सुरू होणार असल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Team Agrowon

Pune News : सातगावपठार (ता.आंबेगाव ) व वाफगाव, जवळके, वरुडे (ता. खेड) येथे सोमवारी (ता १७) दुपारी तीन वाजता मुसळधार पाऊस पडला. यामुळे शेतांत पाणी साचले. पावसामुळे बटाटा लागवडीची कामे येत्या दोन तीन- दिवसांत सुरू होणार असल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कुरवंडी, थूगाव, कोल्हारवाडी, भावडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड ही गावे सातगाव पठार भागात तसेच खेड तालुक्यातील वरुडे वापगाव जवळके आदी गावांमध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड शेतकरी करतात. या भागाला बटाट्याचे आगर म्हणूनच ओळखले जाते.

गेली काही दिवस शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते .पण सतत पाऊस हुलकावणी देत होता. मात्र, सोमवारी तीन वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः पारगाव व परिसरातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागात ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. कुरवंडी, पेठ भागात शेतामध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यावरूनही पाणी वाहत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीची जय्यत तयारी केली आहे .अशी माहिती पारगाव तर्फे खेड येथील बटाटा उत्पादक शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील व पेठ येथील जयश्री दिलीप धुमाळ यांनी दिली.

साधारणतः सातगाव पठार भागामध्ये पाच हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. बटाटा वाण अनेक शेतकऱ्यांनी खरेदी करून ठेवला आहे. तर काहीजणांनी आजच हुडेकरी व्यवसायिकांकडे बटाटा वाणाचे बुकिंग केले आहे. बटाटा लागवडीसाठी आवश्यक असलेल्या शेतमजुरांची जुळवा जुळवाकरण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच काही शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून ट्रॅक्टर द्वारे बटाटा लागवड करणार आहेत.
- अशोक बाजारे, बटाटा उत्पादक शेतकरी भावडी (ता. आंबेगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Development: मुख्यमंत्री बळीराजा योजनेत १५२ शेतरस्त्यांचे प्रस्ताव

Calf Care in Summer: उन्हाळ्यात वासरांची घ्या खास काळजी; उष्माघातापासून करा बचाव

Illegal Cotton Seeds: अवैध कापूस बियाणे विक्रीवर कारवाई

Rural Water Crisis: गादेगावच्या नागरिकांचा घागर मोर्चा

Sawantwadi Rain Damage: सावंतवाडीला वादळाचा तडाखा

SCROLL FOR NEXT