Rain Update : राज्यात पाऊस उघडला

Rain News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून राज्यातील अनेक भागात आता पावसाने उघडीप दिली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून राज्यातील अनेक भागात आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतात वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरण्यांसाठी लगबग सुरू आहे. कोकणात भात रोपवाटिकेची कामे तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यांत पेरण्यांना सुरवात झाली आहे. येत्या काळात पेरण्यांना आणखी वेग येणार आहे.

सध्या कोकणात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत. दापोली येथे ६०.५, तर मंडणगड येथे ४०.७ मिलिमीटर पाऊस पडला आणि इतर भागांत हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे भात खाचरातील पाणी कमी झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी भात रोपे उगवली आहेत. आतापर्यंत कोकणात १९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही खानदेशात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी

Rain Update
Rain Update : राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप

ऊन पडल्याने पेरण्यांना वेगात सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक विभागात ३८ हजार ९८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात धुळे जिल्ह्यात १६ हजार ६६७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नगर, पुणे भागात अजूनही पेरण्यांना सुरवात झाली नसली तरी, सोलापूरमध्ये ८०० हेक्टर, कोल्हापूर विभागात दहा हजार ३२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन कमीअधिक पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये ३४.४, तर सेलूमध्ये २९.३ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी कडक ऊन पडल्याने कापूस, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १२३० हेक्टर, तर लातूरमध्ये १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Rain Update
Rain Update : राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची उघडीप

विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. बुलडाण्यातील चिखलीमध्ये ४०.५, तर मोताळामध्ये ३३.१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात पावसासाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांवर भर दिला आहे.

राज्यात शनिवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस (मिमी)

कोकण : मुरूड २४.८, श्रीवर्धन २८.६, म्हसळा २२.९, तळा १५.३, चिपळून २९, खेड ३०.१, मंडणगड ४०.७, रत्नागिरी १७.९, संगमेश्वर १८.०, राजापूर २०.४, लांजा १७.७, मालवण २२.८, कणकवली २०, दोडामार्ग ३९.३, वाडा २६.४, पालघर ११.२,

मध्य महाराष्ट्र : मुक्ताईनगर २३.२, चाळीसगाव ३३.८, जामनेर २१.८, बोधवाडा १६.१, वेल्हे ११.६, बार्शी १८.३, माढा ११.४, पंढरपूर ११.५, बावडा १९.७

मराठवाडा : कन्नड ११.४, सोयेगाव १७, फुलंब्री २४.२, भोकरदन १५.१, जाफराबाद १३.९, जालना २८.१, परतूर २०.८, बदनापूर १८.७, मंथा १३.१, पाटोदा १०.६, धारूर २७.०, लातूर २४.२, धाराशिव १५.९, तुळजापूर १३.५, गंगाखेड २६.२, जिंतूर १८.५, सेनगाव १५.४.

विदर्भ : बुलडाणा २१.०, मलकापूर २१.९, कारंजा १७.७, नांदगाव खांडेश्वर ३२.२, बाभूळगाव १५.५, मारेगाव १९.४, राळेगाव १८, शिंदेवाही २०.२, देसाईगंज वडसा २०.१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com