Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीचे पंचनामेच नाहीत

Pre Monsoon Rain : नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने कांदा, तूर, ज्वारी व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने कांदा, तूर, ज्वारी व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. यावल, चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव व इतर तालुक्‍यांत मोठी हानी झाली आहे.

भुसावळात सुमारे दोनशे ते सव्वादोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण शासकीय दरबारी एक हजार हेक्टरवरदेखील जिल्ह्यात नुकसान झालेले नाही, असा अहवाल आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. तालुक्‍यात गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे २२५ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचनाम्यांच्या सूचना दिल्यानंतर अद्याप अनेक ठिकाणी कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी आदींच्या माध्यमातून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. दोन ते तीन दिवसांत अंतिम अहवाल प्राप्त होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल, त्यांनी गावातील ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्याकडून पंचनामे करून घ्यावेत. यासोबत कापूस पिकांचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढल्या असल्यास नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत कंपनीकडे सीएससी सेंटरमधून तक्रार करावी,

असे तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी सांगितले. भुसावळ येथे ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्या माध्यमातून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT