Crop Damage Survey : ठरावीक शेतकऱ्यांचेच पंचनामे

Unseasonal Rain Crop Damage : इगतपुरी तालुक्यातील भरवीर बु. व घोरपडेवाडी येथे मागीलवर्षी मे-२०२२ मध्ये मध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील भरवीर बु. व घोरपडेवाडी येथे मागीलवर्षी मे-२०२२ मध्ये मध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले; परंतु मर्जीतील ठरावीक शेतकऱ्यांचेच पंचनामे केले. त्यानुसार ५ जून २०२३ च्या महसूल निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाई फक्त पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळाली.

मात्र गारपिटीने मोठे नुकसान होऊनही या भागातील २० ते २५ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून हा प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. जिल्हा प्रशासनाला हा प्रकार कळविला आहे. पाठपुरावा करूनही त्यांना अद्याप काही उत्तर प्राप्त झालेले नाही. शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’ने बीडमध्ये २८६ हेक्टर पिकांचे नुकसान

भरवीर बु. व घोरपडेवाडी परिसरात गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये काढणीस आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पंचनामे कृषी सहायक नितीन साळुंके व तलाठी श्रीमती रोकडे यांनी केले आहे. नुकसान असूनही जवळपास ३० शेतकऱ्यांच्या नुकसानीचा उल्लेख पंचनाम्यात नमूद केलेला नाही.

Crop Damage
Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा

त्यामुळे ठरावीक लोकांची नावे नुकसानभरपाई यादीत आले आहे. त्यामुळे महसूल व वन विभाग वन विभागाच्या ५ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही त्यांना आजपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही कुठलीही कारवाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे या कार्यालयावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जागेवर बसून पंचनामे केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आम्ही शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून पाठपुरावा करत आहेत. जिल्हा प्रशासन, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत पाठपुरावा कुणीही साधे उत्तर देत नाही.
- बाळासाहेब घोरपडे, नुकसानग्रस्त शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com