Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : खानदेशात सात साखर कारखाने सुरू होण्याचे संकेत

Sugarcane Crushing Season : खानदेशात ऊस लागवड काहीशी वाढली आहे. यासोबत गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्याही वाढली असून, यंदा लहान व मोठे मिळून सात साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस लागवड काहीशी वाढली आहे. यासोबत गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्याही वाढली असून, यंदा लहान व मोठे मिळून सात साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत आहेत. गाळपासंबंधी काही कारखान्यांनी तयारीदेखील केली आहे.

येत्या विजयादशमीला गाळपाचा मुहूर्त काही कारखाने करतील, अशी माहिती आहे. खानदेशात उसाची सर्वाधिक सुमारे १५ हजार हेक्टर एवढी लागवड जळगाव जिल्ह्यात झाली आहे. त्यापाठोपाठ नंदुरबारात १२ हजार हेक्टर एवढी लागवड नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. धुळ्यातही सुमारे पाच हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

जळगाव जिल्ह्यात ऊस लागवडीत चाळीसगाव तालुका पुढे आहे. तसेच चोपडा, यावल, मुक्ताईनगर भागात झाली आहे. धुळ्यात शिरपूर, साक्री तालुका ऊस लागवडीत आघाडीवर आहे. धुळ्यात मात्र कुठलाही साखर कारखाना सुरू नाही. शिरपूर कारखाना भाडे तत्त्वाने देण्याबाबत हालचाली सुरू होत्या, परंतु त्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही किंवा कुणीही हा कारखाना सुरू करण्याची तयारी केलेली नाही, अशी माहिती मिळाली.

नंदुरबार जिल्ह्यात तीन कारखाने सुरू होतील. तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरीदेखील सुरू होईल. त्यात समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान कारखाना, डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी कारखाना, पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा कारखाना सुरू होईल.

जळगाव जिल्ह्यातही तीन कारखाने सुरू होतील. त्यात चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा कारखाना, घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथील मुक्ताई कारखाना व भोरस (ता. चाळीसगाव) येथील कारखाना सुरू होईल. न्हावी (ता. यावल) येथील मधुकर कारखान्यासंधी अद्याप स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही.

खानदेशात मागील वेळेसही लहान व मोठे मिळून सात कारखाने सुरू होते. गाळप मार्चअखेरीस बऱ्यापैकी झाले होते. सर्वाधिक गाळप समशेरपूर येथील कारखान्याने केले होते. यंदाही या कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापाठोपाठ मुक्ताई, चोपडा, डोकारे येथील कारखान्यांनी गाळप केले होते.

ऊस खानदेशात पुरेसा आहे. लागवड कमी झालेली नसल्याने गाळपासंबंधी कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार नाही. खानदेशात मागील वेळेस फक्त चाळीसगाव व साक्री तालुक्यातून नाशिक व छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसतोड केली होती. यंदा साक्रीतून नाशकात ऊस पाठविला जाईल. परंतु ऊस शिल्लक राहण्याची समस्या नसणार, असेही दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT