Fertilizer Shortage agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात खत तुटवड्याची शक्यता

Ratnagiri Rice Crop : रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. नाचणीची १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते.

Team Agrowon

Ratnagiri Kharip Season : रत्नागिरीमध्ये खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे एकूण १२ हजार ९०९ टन खताची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत युरियाची एकमेव रेक आली असून, २५६१ टन खताची आवक झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात खतांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.

युरिया खताचा वापर सर्वाधिक होत असला तरी एम. ओ. पी, डी. ए. पी, संयुक्त खते, एस. एस. पी. यासारख्या खतालाही शेतकऱ्यांकडून मागणी असते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. नाचणीची १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते.

खरीप हंगामात ८० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असते. जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिके घेण्यात येत असून, पेरणी, लागवड व लागवडीनंतर खताची मात्रा पिकाला देण्यात येत असल्याने खतांना मागणी आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण आहे. शिवाय आंबा संपल्याने बागायतदारांनी कलमांची साफसफाई, खते देण्यासाठी अळी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

यावर्षी उष्मा भरपूर असल्यामुळे शेतकरी शक्यतो मिश्रखतांचा वापर करू लागले आहेत. मंजूर खत साठ्यापैकी २,५६१ टन खत आले असून, उर्वरित खत टप्प्याटप्प्याने येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे ७४२४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे, मात्र अद्याप ३८१ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. पेरणीपूर्व बियाणांची उपलब्धता शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT