Kharif Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Production : सांगलीत खरीप पीक उत्पादनात ६० टक्के घटीची शक्यता

Kharif Season : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. हंगामाच्या प्रारंभापासून पावसाने दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. परिणामी खरिपातील पिकांच्या उत्पादनात ६० टक्के घट असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर आहे. हंगामाच्या प्रारंभापासून पावसाने दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले. परंतु पाऊस पडेल या आशेवर यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ५३ हजार ६६ हेक्टरवर पेरा झाला.

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर पाऊस उघडला. जून महिन्यात ३५.७, जुलैमध्ये १७२.१, ऑगस्टमध्ये ३३.३, सप्टेंबरमध्ये ११२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वास्तविक, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, खानापूर या दुष्काळी तालुक्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्याने कडधान्याच्या पेरण्या झाल्याच नाहीत.

त्यातच अनेक गावांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी वाळून गेली. तर काही ठिकाणी हलका पाऊस तर काही भागांत रिमझिम सुरू होती, त्यामुळे पिके जगली. परंतु पुरेशी वाढ झाली नाही. पावसाने दडी मारल्याने हाताशी आलेली पिकेही डोळ्यादेखत जळून गेली.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम भरपाईसाठी सर्वेक्षण केले. त्यात बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वेक्षणातून पिकांच्या उत्पादनात ६० टक्के घट होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली. परंतु पीक कापणीनंतर उत्पादनात किती घट होईल, हे निश्चित होणार असल्याचेही कृषी विभागाने सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT