Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : पाणी टंचाई, उष्णतेमुळे डाळिंब फुलगळीचे संकट

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News :
सांगली ः राज्यात पाणीटंचाई असूनही शेतकऱ्यांनी डाळिंबाचा आंबिया बहार धरला आहे. सध्या या हंगामातील बागा फुरोलावस्थेत आहेत. फळावर असलेल्या बागांवर सनबर्निंगचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका बागांना बसेल. सुमारे ५० टक्के फूलगळ होण्याची भीती डाळिंब उत्पादकांमध्ये आहे.

जानेवारीपासून डाळिंबाचा आंबिया बहार धरणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. त्यास पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याची काटकसर करीत आंबिया बहार धरला आहे. डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. यंदाच्या या बहरात शेतकऱ्यांनी २५ हजार हेक्टरवर हंगाम साधला आहे. मध्यंतरी पोषक वातावरण राहिल्याने बागांचे सेटिंग चांगले झाले आहे. त्यामुळे कळी निघण्यास अडचणी आल्या नाहीत. अनेक भागात बागा फुरोलावस्थेत आहेत. तर डिसेंबरमध्ये धरलेल्या बागांत लहान आकाराची फळे लागली आहेत.

पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे बागेला पाण्याची गरज आहे. सिंचन योजनांच्या कालव्यांचे पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बागेला टॅंकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. परंतु जवळपास विकत घेण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

वाढत्या उष्णतेसह कमी पाण्यामुळे बागांत फूलगळ होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे वातावरण असेच राहिले किंवा संकट वाढले तर आंबिया बहारातील ५० टक्के फूलगळ होण्याची भीती आहे.


अंबियातील डाळिंब बागा फुलोऱ्यात आहेत. मात्र, पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानामुळे फूलगळ होण्याची भीती आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांवर संकट आले आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष,
अखिल भारतीय डाळिंब संघ.

डिसेंबरमध्ये आंबिया बहार धरला, पण पाणीटंचाई आणि उष्णतेमुळे अडचणी वाढल्या आहेत. सध्या १०० ते २०० ग्रॅमपर्यंत फळे असून सध्या सनबर्निंगचा फटका बसू लागला आहे.
- प्रवीण अनपट, सरकलवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT