Pomegranate Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Disease : डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचे थैमान

Pomegranate Farming : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुमारे १५ मेपासूनच पावसाला सुरवात झाली. कमी-अधिक प्रमाणात दररोज पाऊस पडतोय. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता ६० टक्केच्या वर गेली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. याचा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाच्या बागांना फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा सुमारे १५ मेपासूनच पावसाला सुरवात झाली. कमी-अधिक प्रमाणात दररोज पाऊस पडतोय.

त्यामुळे वातावरणातील आर्द्रता ६० टक्केच्या वर गेली आहे. तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहात आहे. असे वातावरण डाळिंबाच्या बागेवर तेलकट डाग वाढीसाठी पोषक ठरत आहे.

त्यामुळे प्रत्येक स्टेजमधील डाळिंबाच्या बागांमध्ये तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मृग बहारातील डाळिंब बागा सध्या फळावर आहेत. त्यामुळे फळांवर असलेल्या बागांना या वातावरणाचा जास्त धोका आहे.

तेल्या रोगाचे शास्त्रीय नाव Bacterial Blight आहे. हा रोग Xanthomonas axonopodis pathovar punicae या जिवाणूमुळे होतो. तेल्या रोग नियंत्रणात येण्यासाठी शेतकरी सध्या बागेवर व जमिनीवर औषधांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दररोज लाखो रुपये खर्च होत आहेत.

चुकीच्या औषधांची फवारणी केल्यामुळेही शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे. जिल्ह्यात सगळीकडे पावसाळी वातावरण टिकून राहिले आहे. मध्येच ऊनही पडते. त्यामुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांवर तेल्याने थैमान घातले आहे. तेल्या रोग नियंत्रणावरील खर्च वाढू लागल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दर दबावातच, आले दर टिकून, मेथी भाजी तेजीत, लिंबाचे दर स्थिर तर संत्र्याला उठाव

Oil Seed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर राहण्याची शक्यता

Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर 

Cooperative Bank: जिल्हा बँकेच्या ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ सेवेला सुरुवात

Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT