River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

River Pollution : पंचगंगा, वारणा नद्यांना प्रदूषणाचा घट्ट विळखा

Panchganga Warana River Pollution : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा नद्यांना प्रदूषणाचा विळखा घट्ट बनला आहे. दोन्ही नदी काठांवरील लाखो जलचरांचा मृत्यू झाला असून मासे पाण्यावर तरंगत असल्‍याचे चित्र आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा नद्यांना प्रदूषणाचा विळखा घट्ट बनला आहे. दोन्ही नदी काठांवरील लाखो जलचरांचा मृत्यू झाला असून मासे पाण्यावर तरंगत असल्‍याचे चित्र आहे.

यामुळे अनेक गावांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. पंचगंगेबरोबरच स्वच्छ समजल्या जाणाऱ्या वारणा नदीचे पाणीही प्रदूषित बनले आहे. अनेक गावांनी या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा घाटावर गेल्या तीन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत असल्याने या नदीच्या काठावरील जनजीवन विस्कळित बनले आहे. दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्‍यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक वर्षी ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर नदीत दूषित पाणी मिसळण्याचा प्रकार गेली काही वर्षे सातत्याने दिसून येत आहे.

त्यामुळे गेल्या काही वर्षांत वारणा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मळीमिश्रित, रसायनयुक्त दूषित सांडपाणी नदीत सोडणे, मासेमारीसाठी घातक गोष्टींचा वापर करणे आदी कारणांमुळे वारणा नदी प्रदूषित होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अनेक गावांतील ग्रामस्‍थांनी पाणी उकळून पिण्‍याचे आवाहन केले आहे. विशेष करून वारणा नदी काठावरील गावांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक गावांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषित पाणी पाजण्याचा इशारा दिला आहे.

पिण्यासाठी नद्यांच्या पाण्‍याचा वापर होणाऱ्या गावांमध्ये साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. वारणा नदी प्रदूषणासंदर्भात जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांतर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजण्यात येईल, असा ठराव दानोळी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला.

कागदी घोडो नाचविण्याचा प्रकार

नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या घटकांविरोधात केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक गावांचे नदी किनारे दुर्गंधीयुक्त पाण्याने व्‍यापले आहे. माशांचे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मगरीसारखे प्राणीही मृतावस्‍थेत सापडत आहे. शेतीचे पाणी देताना त्याला मोठी दुर्गंधी येत असल्याने शेतीला पाणी देणेही असह्य झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT