Swatantra Bharat Paksh Agrowon
ॲग्रो विशेष

Swatantra Bharat Paksh : शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविणाऱ्या राजकीय नेत्यांना जाब विचारणार

Farmer Issue Update : शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यास गावात येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाब विचारणार, असा इशारा नाशिक जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने देण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : राज्यातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटसारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयत करून शेतीमालाचे भाव पाडत आहे.

परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यास गावात येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाब विचारणार, असा इशारा नाशिक जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने देण्यात आला.

पक्षातर्फे गुरुवारी (ता. १८) ईदगाह मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे,

जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शंकर ढिकले, शैलेंद्र कापडणीस, निर्मला जगझाप, किसन शिंदे, रामनाथ ढिकले, सुरेश जाधव, बाळासाहेब बोरस्ते, त्र्यंबक चव्हाणके, दत्तात्रय कडलग, ज्ञानेश्वर गायकवाड, कैलास पवार आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT