Bull Theft in Sindkheda Agrowon
ॲग्रो विशेष

Bull Theft in Sindkheda: शिंदखेड्यातील चोरी गेलेले बैल शेतकऱ्यांना परत

आरावे येथील शेतकरी भिका विठ्ठल धनगर, विनोद तुळशीराम पाटील यांच्या मालकीचे चार बैल ३ फेब्रुवारीला चोरीस गेले होते. शेतकऱ्यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Team Agrowon

Bull Theft News चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात जनावरे चोरणारी (Animal Thieves) टोळी काही दिवसांपासून सक्रिय झाली आहे. गुरुवारी (ता.९) शिंदखेडा पोलिसांनी मध्य प्रदेशातील पिकअप चालकाला अटक करून आरावे (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्यांचे चार बैल शुक्रवारी (ता.१०) परत केले.

आरावे येथील शेतकरी भिका विठ्ठल धनगर, विनोद तुळशीराम पाटील यांच्या मालकीचे चार बैल ३ फेब्रुवारीला चोरीस गेले होते. शेतकऱ्यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले चार बैल, पिकअप (एमएच ४८ टी १६१५) असा एकूण चार लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पिकअप शिरपूर तालुका हद्दीत मिळून आली. त्यावरील चालक बबलू सलदर्या कन्नोजे (वय २७, रा. धानोरा, जि. बडवानी मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील भाबड, उपनिरीक्षक मिलिंद पवार, सदेसिंग चव्हाण, दीपक पाटील, मयूर थोरात, मोहन सूर्यवंशी, विजय पाटील यांचा पथकात समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT