Election Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Election Update : आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या, असे आवाहन बीड मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी (ता. ३०) केले.

Team Agrowon

Beed News : आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या, असे आवाहन बीड मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी (ता. ३०) केले.

राजकीय पक्षांच्या चिन्ह वाटपाची बैठक राजकीय पक्षांनी यापुढे घ्यावयाची काळजी या संदर्भातील सूचनांची माहिती देण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे आणि निवडणूक निरीक्षक हक यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलविण्यात आली होती.

त्या वेळी श्री. हक यांनी हे आवाहन केले. हक म्हणाले, की सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे राहणार असून माझ्याशी थेट संपर्क करता येईल. यावेळी त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५९२५११ राजकीय पक्षांना दिला आहे.

निवडणूकीच्या काळात प्रत्येक घरावर एका पक्षाचे तीन अथवा तीन पक्षाचे एक-एक ध्वज लावता येतील. गाड्यांवर बॅनर लावता येणार नाही. स्टिकर लावण्यास हरकत नाही. मात्र पुर्वपरवानगी शिवाय लावू नये. निवडणूक काळात आदर्श आचारसंहिताचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे.

भारत शासनाने प्लॅस्टिकबंदी केली असून प्लॅस्टिकचा वापर प्रचारादरम्यान करू नये. सीव्हीजीएल ॲपचा वापर करून आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे. १०० मिनिटांच्या आत ॲपवर तक्रार केल्यास कारवाई करण्यात येते. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे प्रचारादरम्यान हनन होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही हक यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT