पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच (पीएम किसान) योजनेचा १७ व्या हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१८) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. देशातील ९ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी सखींचं प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भगीरथ चौधरी, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवसिंह मौर्य, प्रदेश पाठक आणि शेतकरी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी देशातील कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचं महत्त्व यावर भाष्य केलं. मोदी म्हणाले, "देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कृषी क्षेत्राचं योगदान महत्त्वाचं आहे. देशाला तेलबिया आणि कडधान्यात आत्मनिर्भर करायचं आहे. तसेच शेतमालाच्या निर्यातीत अग्रणी बनायचं आहे. माझं स्वप्न आहे की, जगातील प्रत्येक देशात भारतातील खाद्यन्न पोहचला पाहिजे."असं मोदी म्हणाले.
पुढे म्हणाले, "भरडधान्य उत्पादन, औषधी वनस्पती, नैसर्गिक शेती यांच्याकडे जाण्यासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत होत आहे. तसेच शेती क्षेत्रातील महिलांना समावून घेतलं जाणार आहे. त्यासाठी कृषी सखीच्या माध्यमातून ३० हजार महिला बचत गटांना प्रमाणपत्र आहे. त्यातून ३ लाख कोटी लखपती दीदी तयार करण्यास मदत करेल." असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, २०१९ पासून पीएम किसान योजनेतून दरवर्षी तीन टप्पात शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा केले जातात. १६ वा हप्ता लोकसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातील यवतमाळ येथील सभेत जमा करण्यात आला होता. मोदी सरकार ३.० च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. शेतकऱ्यांशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करत पहिला निर्णय घेत पीएम किसान सन्मान निधीचा १७वा हप्ता जारी केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.