PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पीएम किसान योजनेचे पैसे वितरित झाले; खात्यात जमा झाले का? सोप्या पद्धतीनं तपासून घ्या!

अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

Dhananjay Sanap

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचं मंगळवारी (ता.१८) वाराणसी येथे वितरण केले. देशातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रक्कम पाठवण्यात आले. शेतकऱ्यांना १७ वा हप्ता कधी मिळेल, याची प्रतीक्षा होती. कारण पीएम किसान योजनेत लोकसभा निवडणुकांनंतर बदल करण्यात येतील, अशी चर्चा होती. अखेर रक्कम वितरित करण्यात आली आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झाले नाहीत.

तर काहींना अडचणी येत आहेत. कारण अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन केवायसी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन (pmkisan.gov.in) वर करता येईल.

पीएम किसानचे पैसे जमा झाले की, नाही याची माहिती घेण्यासाठी pmkisan.gov.in वर जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करून राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून 'गेट रिपोर्ट'वर क्लिक करा. तुम्हाला सर्व माहिती येथे मिळेल.

पीएम किसानचे पैसे जमा झाले नसतील तर तक्रार करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी हेल्प डेस्क या ऑप्शनला क्लिक करा. तिथं आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्या. त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा. क्वेरीचा अर्ज मिळेल. त्यामध्ये आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्या. समस्या काय आहे ते नमूद करा. आणि सबमिट करा.

किंवा तुम्ही 0120-6025109, 011-24300606 वर किंवा 155261 या नंबरवर तक्रार करू शकता. तसेच pmkisan-ict@gov.in ईमेल वर मेल करू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT