Kailash Choudhary Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : पीएम किसान योजनेसाठी AI Chatbot लॉन्च, ६ भाषांमध्ये सेवा उपलब्ध

Kisan e-Mitra : केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या हस्ते काल पीएम किसान एआय चॅटबॉट लाँच करण्यात आले. सध्या ते सहा भाषांमध्ये उपलब्ध असून लवकरच 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Swapnil Shinde

PM Kisan AI Chatbot Launch : प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी AI चॅटबॉट गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लॉन्च केले. हे AI चॅटबॉट PM-KISAN योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांना त्वरित, स्पष्ट आणि अचूक प्रतिसाद देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.चॅटबॉट सध्या इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि तमिळमध्ये उपलब्ध आहे. हे लवकरच देशातील सर्व 22 भाषांमध्ये उपलब्ध होईल.

या AI चॅटबॉटवर शेतकऱ्यांना अनेक सुविधा मिळतील. याच्या मदतीने शेतकरी या चॅटबॉटद्वारे त्यांचा नंबर, जमिनीशी संबंधित माहिती किंवा नवीन तपशील अपडेट करू शकतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहून किंवा बोलून पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित प्रश्न विचारू शकता. संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईलद्वारे शेतकरी या सुविधेचा २४ तास लाभ घेऊ शकतात. सध्या चॅटबॉट इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओरिया आणि तमिळ या सहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ते देशातील २२ भाषांमध्ये उपलब्ध होईल. हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मंत्री कैलास चौधरी यांनी व्यक्त आहे.

एआय चॅटबॉट म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या लाॅंच केल्यापासून आतापर्यंत सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 2 लाख 61 हजार कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

पीएम किसानचे आधुनिकीकरण करून शेतकऱ्यांसाठीच्या सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. आता कृषी मंत्रालयाने पीएम किसान पोर्टलवर ई-किसान चॅटबॉट सुरू केले आहे, ज्याचे नाव ई-मित्र आहे. त्याच्या मदतीने शेतकऱ्यांना काही सेकंदात वेगवेगळी माहिती मिळू शकणार आहे. हा चॅटबॉट शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी कमी वेळात देईल.

चॅटबॉट कसा वापरायचा

या चॅटबॉटवर शेतकरी इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि तमिळ भाषेत प्रश्न विचारू शकतात. त्यांना त्याच भाषेत उत्तरे मिळतील. तुम्ही चॅटबॉटचा पर्याय उघडताच, तिथून एक आवाज येतो ज्यात प्रिय लाभार्थ्याला त्याचा प्रश्न टाईप करा किंवा माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. त्यानंतर शेतकरी त्यांच्या सोयीनुसार प्रश्न विचारू शकतात आणि लगेच उत्तरे मिळवू शकतात. संगणक, मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून शेतकरी या चॅटबॉटचा वापर करू शकतात. ही सुविधा चोवीस तास उपलब्ध आहे ज्यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, पात्रता स्थिती, वर्तमान स्थिती आणि हप्ता इत्यादींबद्दल जाणून घेऊ शकतात. शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते या चॅटबॉटच्या मदतीने त्यांचा मोबाईल क्रमांक आणि जमिनीचा तपशील अपडेट करू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT