PM Awas Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Awas Yojana : पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत एक लाख २० हजार नोंदणी पूर्ण

Government Housing Scheme : पंतप्रधान निवास योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात ‘प्रपत्र ड’मधील प्रतीक्षा यादीतील एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : पंतप्रधान निवास योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात ‘प्रपत्र ड’मधील प्रतीक्षा यादीतील एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. यावर्षी राज्य शासनाने नांदेड जिल्हा परिषदेला या योजनेअंतर्गत एकूण एक लाख दहा हजार ३० घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी दिली.

ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात हे उद्दिष्ट निश्चित होईल. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्ड, बँक खाते, जॉब कार्ड, नमुना नंबर आठ व ग्रामपंचायतीची मान्यता यासह इतर आवश्यक माहितीची नोंद करण्यात आली आहे.

त्वरित नोंदणी करावी

घरकुलाच्या लाभासाठी कोणत्याही आर्थिक व्यवहाराची गरज नाही. प्रतीक्षा यादीत असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल. ज्यांचे नाव या यादीत नाही पण ते पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन मीनल करनवाल यांनी केले.

तालुकानिहाय घरकुलांची नोंदणी

अर्धापूर १,९३६

बिलोली ७,४४४

किनवट ९,७८५

हदगाव ११,०६७

भोकर ५०५८

हिमायतनगर ४,८९०

देगलूर ९,१०५

मुदखेड २,९४४

मुखेड १६,५३१

धर्माबाद ३,१५२

नांदेड ५,२२८

कंधार १०,६४१

नायगाव १०,७१५

उमरी ६,१०७

लोहा ९,७६९

माहूर ५,५९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT