Gharkul Scheme : निधीअभावी घरकुलांचे काम रखडले

Pradhan Mantri Awas Yojana : शहापूर तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या राज्याच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे बांधकाम निधीअभावी रखडल्याने भरपावसात भाडोत्री खोलीचा आधार घ्यावा लागला असल्याची भयानक परस्थिती आवरे येथील प्रमोद गायकर या लाभार्थ्यांवर ओढवली आहे.
Gharkul Scheme
Gharkul SchemeAgrowon
Published on
Updated on

Khardi News : शहापूर तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या राज्याच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे बांधकाम निधीअभावी रखडल्याने भरपावसात भाडोत्री खोलीचा आधार घ्यावा लागला असल्याची भयानक परस्थिती आवरे येथील प्रमोद गायकर या लाभार्थ्यांवर ओढवली आहे.

घरकुल योजनेचे एक लाख २० हजारांचे अनुदान वेळेवर मिळणार या हेतूने व्याजावर पैसे घेऊन घराचे बांधकाम सुरू केले असून बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, सिमेंट, पत्रे, लोखंड, दरवाजे, खिडक्या घरकुलाचे पैसे मिळाल्यावर देण्याच्या बोलीवर व्यापाऱ्यांकडून उधार घेतले आहेत.

Gharkul Scheme
Gharkul Scheme : परभणीत १३ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी

तालुक्यात या योजनेतून २०२३-२४ या वर्षी एकूण ७५५ घरकुले मंजूर आहेत. यामधील ७३९ लाभार्थ्यांना १५ हजारांचा पहिला हप्ता देण्यात आला मात्र १६ लाभार्थी वंचित आहेत. ४५ हजारांचा दुसरा हप्ता अवघ्या ३९० लाभार्थ्यांना मिळाला आहे व ३६५ लाभार्थी वंचित ठेवण्यात आले आहेत.

Gharkul Scheme
Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

४० हजाराचा तिसरा हप्ता अवघ्या १७० लाभार्थ्यांना मिळाले असून ५८५ लाभार्थी वंचित आहेत. २० हजारांचा चौथा अंतिम हप्ता अवघ्या १८ लाभार्थ्यांनाच दिला असून ७३७ लाभार्थी निधीपासून वंचित आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरांचे काम अर्धवट राहिले आहे.

घरकुल टप्प्याटप्प्यात जसे पूर्ण होईल, तसे चार टप्प्यांत शासनाकडून ऑनलाइन हप्ते मागविले आहेत. निधी उपलब्ध झाल्यास घरकुल लाभार्थ्यांना निधी तत्काळ दिला जाईल.
भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com