Water Crisis
Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पठारभागाला बसणार पाणी टंचाईच्या झळा

Team Agrowon

Nagar News : संगमनेर तालुक्याच्या पठारभागावर समाधानकारक पाऊस न झाला नाही. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, ओढे- नाले कोरडाठाक आहेत. परिणामी, पठारभागाला लवकरच पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.

दरवर्षी पठारभागावर समाधानकारक पाऊस होतो. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, ओढे- नाले तुडूंब भरून वाहत असतात. थोड्याफार प्रमाणावरच काही गावांसह वाड्या-वस्त्यांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात असतो.

मात्र यावर्षी फार कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे याचा फटका आंबीखालसा साठवण तलावासह अनेक बंधाऱ्यांना बसला आहे. तर सोयाबीनसह खरिपाची पिके वाया गेली आहेत. ओढे- नाले वाहिले नसल्याने विहिरी, बोअरवेल यांचीही पाणीपातळी वाढली नाही. तर सध्या काही गावांना दोन महिने पुरेल येवढेच पाणी आहे.

काही गावांनी पाणी टंचाईचे प्रस्तावही तयार करण्यास सुरवात केली असल्याचेही सरपंच व ग्रामसेवकाने सांगितले आहे. त्यामुळे पठारभागाला लवकरच पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याची स्थिती आहे.

समाधानकारक पाऊस न झाल्याने पठारभागावरील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. त्यातच शेतीमालाला बाजारभाव नाही. खरिपाची पिकेही वाया गेली आहेत. पाण्याअभावी बंधारेही भरले नाहीत. ओढ्या- नाल्यांनाही पाणी आले नाही, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. काही विहिरी कोरड्याठाक आहेत. त्यामुळे लवकरच पठारभागाला पाणीटंचाईची भासेल.
- संदीप भागवत, माजी सरपंच, कर्जुले पठार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon: राज्यात अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम

Maize Market : मलकापुरात मक्याला सरासरी २३०० रुपयांचा दर

Milk Subsidy Scheme : दूध अनुदान योजना केवळ मलमपट्टी ठरण्याची शक्यता

Banana Market : खानदेशात केळी दरात चढउतार

Sugar Factory Loan : सत्ताधाऱ्यांना थकहमी, विरोधकांची कोंडी

SCROLL FOR NEXT