Tomato Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Cultivation : टोमॅटो लागवड अर्ध्यावर ! टोमॅटोचे दर घसरण्याची शक्यता धुसर

Hike in Tomato Price : दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात ६० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो १५० रुपये किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र घडले आहे. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव गडगडण्याची शक्यता कमी आहे.

Team Agrowon

Tomato Farming : गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने १०० ते १५० रुपयांची सीमाच ओलांडली आहे. मे महिन्यात १५ रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटो सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. मात्र, काही दिवसांत त्याचे दर आवाक्यात येईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीपात टोमॅटोची लागवड सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारात पुरवठा होणार नसल्याने दर नियंत्रणात येण्याची अनिश्चितता आहे.

टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शासनाने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. भाव नियंत्रणासाठी नाफेडच्या माध्यमातून टोमॅटोची खरेदी करुन काही राज्यात कमी दरात विक्री सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पुरवठा वाढल्यास दर नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा शासनाला होती. परंतु कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये टाॅमेटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता कमी आहे.

यामध्ये राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४२ हजार हेक्टर, रब्बी आणि उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. परंतु यंदा माॅन्सूनला उशीरा झाला. त्यामुळे कडक उन्हाचा पिकांवर परिणाम झाल्याने बाजारात आवक वाढली. एप्रिल महिन्यात किलोला ५-६ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बागा सोडल्या.

राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रमाणात टोमॅटो रोपांचे बुकिंग झाले नाही. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते ५५ टक्केच मागणी आहे. त्यामुळे यंदा लागवडीचे क्षेत्र घटल्याने टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे.
डॉ. यशवंत जगदाळे, भाजीपाला गुणवत्ता केंद्र प्रमुख , कृषी विज्ञान केंद्र, बारामती

त्यात जुलै महिन्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. पाण्याची पातळी खालवल्याने शेतकरी टोमॅटोची नवीन लागवड करण्यास धजावले नाहीत. त्यामुळे राज्यभरात जुलैअखेरपर्यंत फक्त २१ हजार ५८१ हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड गतवर्षीच्या सरासरीपेक्षा ५० टक्के कमी आहे. सर्वाधिक टोमॅटो उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक विभागात ११ हजार १२३, पुणे विभागात ३,९७८ लागवड झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २ हजार ३७८, अमरावतीमध्ये ६५०, कोल्हापूर विभागात ४०४ आणि नागपूर विभागात २८३ हेक्टर लागवड झाली आहे.

तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी नवीन लागवडच कमी झाल्याने बाजारात आवक घटणार आहे. त्यामुळे टोमॅटोच्या घाऊक दरात वाढ होऊन त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होणार असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव वाढू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT