Oat Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Oat Fodder cultivation : पोषक, सकस चाऱ्यासाठी ओट लागवड

Fodder Crop : हिरव्या चारा पिकापैकी ओट हे महत्वाच चारा पीक आहे. कारण ओट हे चारा पीक हिरवा चारा, वाळलेली वैरण, भुस्सा किंवा मुरघास म्हणून सुद्धा वापरता येते. त्यामुळे ओट चारा पिकाची लागवड फायदेशिर मानली जाते.

Team Agrowon

Animal Care : हिरव्या चारा पिकापैकी ओट हे महत्वाच चारा पीक आहे. कारण ओट हे चारा पीक हिरवा चारा, वाळलेली वैरण, भुस्सा किंवा मुरघास म्हणून सुद्धा वापरता येते. त्यामुळे ओट चारा पिकाची लागवड फायदेशिर मानली जाते.

जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध  उत्पादनासाठी आवश्‍यक असणारी सर्व  पोषणमूल्ये ही हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. पण हाच हिरवा चारा जनावरांना नियमीत मिळत नाही. जनावरांना नियमीत हिरवा चारा मिळत राहावा यासाठी जर शेतातील काही भागावर जर तुम्ही हिरव्या चाऱ्याची लागवड केली तर जनावरांसाठी घरच्याघरी हिरवा चारा मिळत राहतो. चारा पिकापैकी ओट हे भरपूर फुटवे असणार एकदलवर्गीय चारा पीक आहे. म्हणजेच ओट हे काहीसं गहू पिकासारख दिसणारं, पण गव्हापेक्षा थोडं उंच वाढणारं चारा पीक आहे. ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असतो. खोड रसाळ, लुसलुशीत असत. चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असत. दुभत्या जनावरांना ओट चा चारा दिल्यास दुधाच उत्पादन वाढत याशिवाय दुधातील फॅटच प्रमाणही वाढत.  ओट चारा पीक एकदा लावल की त्यापासून कापणी करुन चारा मिळत राहतो.    

लागवड कशी करायची

क्षारयुक्त किंवा पाणथळ जमिनी सोडून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येत. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत शेणखत, कंपोस्ट खत मिसळावे. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळींत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तुम्हाला चाऱ्याच्या जास्त कापण्या हव्या असतील तर फुले हरिता ही जात चांगली आहे. तर एक कापणीसाठी फुले सुरभी किंवा केंट या जातीची निवड करा.  या सुधारित जातींचे हेक्टरी १०० किलो बियाण लागतं.  पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू सवंर्धकाची बीजप्रकिया जरुर करा.  हेक्टरी जर १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश या खताची मात्रा दिली तर चाऱ्याच चांगल उत्पादन मिळत.  यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी, तर उरलेलं ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी आणि ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्याव. १० ते १२ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी. 

कापणी आणि उत्पादन

ही झाली चारा लागवड आणि व्यवस्थापनाची माहिती. आता पाहुया या पिकाची कापणी नेमकी केंव्हा करायची. पहिली कापणी आपल्याला लागवडीनंतर  ५० दिवसांनी करायची आहे तर  दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी किंवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी. या चाऱ्याला काटे किंवा कूस नसते त्यामुळे कापणी सहजपणे करता येते.  दोन कापण्या घेताना पहिली कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी. दोन कापण्यांमध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळतं. अशा प्रकारे रब्बी हंगामात हिरवा किंवा वाळलेला अशा दोन्ही स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या ओट चारा पिकाची नक्की लागवड करा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT