Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Crop Cultivation : तीन हजार हेक्टरवर ज्वारी, तीळ, बाजरीची लागवड

Cultivation Update : यंदा जिल्हात तीन हजार हेक्टरवर ज्वारी, बाजरी आणि तिळाची लागवड करण्यात आली असून, उन्हाळी सोयाबीनकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णत: गेला आहे. रब्बीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी उन्हाळी पिकाकडे वळले आहेत. यंदा जिल्हात तीन हजार हेक्टरवर ज्वारी, बाजरी आणि तिळाची लागवड करण्यात आली असून, उन्हाळी सोयाबीनकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

गेले वर्ष शेतकऱ्यांची परीक्षा घेणारे ठरले आहे. एकामागून एक नैसर्गिक संकट, किडीचे आक्रमण, उत्पन्नात झालेली घट आणि त्यानंतर आता शेतीमालाला नसलेला भाव, अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. यातूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. लागवडीचा खर्चही निघालेला नाही.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जलसाठा बऱ्यापैकी शिल्लक आहे. जलसाठा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी तसेच उन्हाळी पिकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यंदा रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. गहू तसेच हरभरा पीक चांगल्यास्थितीत आहे. यानंतर आता शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगाम ‘कॅश’ करण्याची तयारी सुरू केली आहे.

यंदा तब्बल तीन हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. यात तीळ, ज्वारी तसेच बाजरीचा पेरा वाढला आहे. गेल्या काही वर्षांत ज्वारी तसेच बाजरी पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. यंदा मात्र या दोन पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. उन्हाळी सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. गेल्या वर्षी तसा प्रयोग जिल्ह्यात करण्यात आला. सध्या सोयाबीनचे दर पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरविली आहे. उन्हाळी सोयाबीनचा पेरा घसरला आहे.

भुईमूग पडले बाजूला

उन्हाळ्यात जिल्ह्यात भुईमुगाची पेरा दर वर्षी होत होता. गेल्या काही वर्षांतील बाजारभाव तसेच लागवड खर्च पाहता शेतकऱ्यांनी भुईमुगाकडे पाठ फिरविली आहे. भुईमुगाऐवजी शेतकऱ्यांनी तीळ, ज्वारी तसेच बाजरीला पसंती दिली आहे. परिणामी, दर वर्षी असलेल्या भुईमुगाच्या पेऱ्यातही मोठी घट दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

Agriculture Innovation: ‘एचटीबीटी’ला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करा

Farmer Protest: कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर, शेतांवर लावणार काळे झेंडे

Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

SCROLL FOR NEXT