Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation: संगमनेर तालुक्यात अडीच हजार वटवृक्षांचे रोपण

Tree For Future: भाऊसाहेब थोरात यांच्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी-वस्तीवर २५२५ वटवृक्षांचे रोपण होणार, असे दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले.

Team Agrowon

Ahilyanagar: थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीसह पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटवृक्ष लागवड सप्ताहात मंगळवारी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी-वस्तीवर २५२५ वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे अभियान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्यप्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणाऱ्या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे.

प्रत्येक नागरिकाचा सहभागामुळे या चळवळीला यश आले आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड माळराने हिरवी होत आहेत. भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा असणारा वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे.

त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात. हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सिजन मिळणार आहे. वटवृक्षाची सावली व थंडावा पशुपक्षांनाही आकर्षित करतो म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गावात व

वाडीवस्तीसाठी किमान पाच असे तालुक्यात एकूण २५२५ वटवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपण करून त्याच्या पूजन व संगोपनाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे. महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Money Lending: अवैध सावकारांविरोधात अकोल्यात धडक कारवाई

Beetroot Farming: बीटरूटने केले अर्थकारण सशक्त

Farmer Issue: गोंदियात धानाचे ५८० कोटींचे चुकारे थकले

Farmer Producer Company: ‘मंदप्रभा’ने दिली हक्काची बाजारपेठ

Farmer Protest: नाशिकमधून उद्या मुंबईकडे ‘लाँग मार्च’

SCROLL FOR NEXT