Mumbai News: राज्याचा सन २०२५-२६ चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी (ता. ५) सादर केला. यामध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नाचा वृद्धिदर ७.३ टक्क्यांवरून ७.९ टक्क्यांवर वाढण्याचे पूर्वानुमान व्यक्त केले आहे. कृषी क्षेत्राची मोठी पडझड झाली असून, गेल्या वर्षीच्या ९.१ टक्क्यांवरून वृद्धिदर ३.४ टक्क्यांवर घसरण्याचा पूर्वानुमान व्यक्त केल्याने कृषी क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरिपातील उत्पन्न, निर्यात, बाजारभाव आणि अन्य कारणांमध्ये शेती क्षेत्राचा वृद्धिदर झपाट्याने खाली आला आहे. खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचाही मोठा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. .शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाच्या उत्पन्नातही घट झाल्याने त्याचा वृद्धिदरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उद्योग क्षेत्राचा वृद्धिदर ४.३ टक्क्यांवरून ७.७ टक्के, तर सेवा क्षेत्राचा वृद्धिदर ८.३ वरून ९ टक्क्यांवर जाण्याचे पूर्वानुमान वर्तविले आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी असलेले कर्जाचे प्रमाण वाढले असून, ते १७.३ वरून १८.३ टक्क्यांवर गेल्याचा तर राजकोशीय तूट २.४ टक्क्यांवरून २.७ टक्क्यांवर जाण्याचेही पूर्वानुमान अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये वर्तविले आहे..Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला.खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये ६.६ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. यामध्ये कडधान्य आणि तेलबियांमध्ये अनुक्रमे २८.२ आणि २९.७ अशी मोठी घट आहे. तांदूळ ४.६, ज्वारी ४४.१, बाजरी ३०.९, नाचणी १५.८, तूर २९.२, कडधान्य २८.२, सोयाबीन ४८.९, भुईमूग १७.१ आणि तेलबियांच्या उत्पादनात ४७.४ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. कापूस आणि ऊस पिकांच्या क्षेत्रात घट अपेक्षित असून, कापसाचे उत्पादन १०.८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. उसाचे उत्पादन ६.६ टक्क्यांनी घटेल, असा पूर्वानुमान आहे. ज्वारी, करडई, सूर्यफूल, जवस आणि तेलबियांच्या क्षेत्रामध्ये घट अपेक्षित असून उत्पादनातही २२.७ टक्क्यांची घट होणार असल्याचा पूर्वानुमान आहे..खरिपाच्या पेरणी क्षेत्रामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ०.६ टक्क्यांनी क्षेत्र कमी असून ऊस आणि मका क्षेत्रामध्ये अनुक्रमे ३०.२१ आणि १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२४-२५ मध्ये राज्यातील फलोत्पादन पिकांखालील अंदाजित क्षेत्र २५.१९ हेक्टर असून त्यामध्ये १५.९ टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये आंबा १.६७, संत्री १.४८, केळी १.४१, द्राक्ष १. १९, डाळिंब १.७ तर मोसंबीची ०.८० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होती..India Agriculture Growth: भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ, चीनला मागे टाकले- नीती आयोग.सेंद्रिय शेतीत प्रथम क्रमांकदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी असून राज्यातील सेंद्रिय शेती खालील क्षेत्र मागील वर्षीपेक्षा घटले असले तरीही ३० टक्के हिश्शासह देशांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे..पीक कर्जापेक्षा मुदत कर्ज जास्त२०२४-२५ च्या तुलनेमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात पीककर्जाचे कमी वाटप केले आहे. कृषी मुदत कर्जही कमी दिले असले तरी पीककर्जाच्या तुलनेमध्ये मुदत कर्जाची आकडेवारी जास्त आहे. २०२५-२६ मध्ये वाणिज्यिक बॅंकांनी २१ हजार ७०१, जिल्हा बँकांनी १९४२, ग्रामीण बँकांनी ३१५१ असे ४३ हजार ८७४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. कृषी मुदत कर्जापोटी वाणिज्यिक बँकांनी ६७ हजार ४८८, जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ६१७, ग्रामीण बँकांनी २०९ असे ६८ हजार ३१४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मागील वर्षी १,७७,२०० कोटी कर्ज वितरित केले होते. तर या वर्षी सप्टेंबरअखेर १ कोटी २२ लाख २०८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे..Agriculture Growth: पीक भरघोस, पण भाव कमी; शेतीच्या सकल मूल्यवर्धनात घटीचा अंदाज, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर संकट .मत्स्य निर्यात आकडेवारी नाही२०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये सागरी मत्स्य उत्पादन ४.६३ तर गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन २.६९ लाख टन होते. २०२५ च्या डिसेंबरपर्यंत सागरी मत्स्य उत्पादन २.९३ आणि गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन १.४७ लाख टन होते. मागील वर्षी २.२३ लाख टन निर्यात झाली असून त्याचे मूल्य ७३४३ कोटी होते. यंदा मात्र निर्यातीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही..आर्थिक विकास दर ७.९ टक्के राहण्याचा अंदाजराज्यातील पायाभूत सुविधांचे निर्माण झालेले जाळे, उद्योग आणि सेवा क्षेत्राची आगेकूच तसेच थेट परदेशी गुंतवणुकीतील अव्वल स्थान, राज्याच्या दरडोई उत्पन्नात झालेली घसघशीत वाढ यामुळे २०२५-२६ या वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर ७.९ टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा अपवाद वगळता उर्वरित क्षेत्रात यंदा मोठी वाढ अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे राज्याने चौफेर विकासाच्या दिशेने झेप घेतल्याचे दिसत असले तरी मार्च २०२६ अखेरीस राज्यावरील कर्जाचा आकडा विक्रमी ९ लाख ३२ हजार कोटी पोहोचणार आहे..India Agriculture Growth: शेतीचा विकास दर ४ टक्क्यांपर्यंत खाली येणार; नीती आयोगानं सांगितलं काय करावं लागेल?.दरडोई उत्पन्नात पिछेहाटदेशात महाराष्ट्र उत्पन्नात आघाडीवर असताना दरडोई उत्पन्नात मात्र महाराष्ट्र स्पर्धक राज्यात पिछाडीवर गेला आहे. २०२४ -२५ या आर्थिक वर्षाचे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ३ लाख १७ हजार ६१९ कोटी एवढे आहे. २०२३ -२४ मध्ये ते २ लाख ८५ हजार २९० एवढे होते. दरडोई उत्पन्नात एका वर्षात वाढ झाली असली तरी दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या स्थानावर गेला आहे. तेलंगणा राज्य पहिल्या स्थानावर असून तेथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे ३ लाख ८७ हजार ६२३ एवढे आहे. त्याखालोखाल कर्नाटक ३ लाख ८० हजार ९०६, तमिळनाडू ३ लाख ६१ हजार ६१९ तर गुजरातचे दरडोई उत्पन्न ३ लाख २७ हजार १९५ एवढे आहे. महाराष्ट्राच्या मागे राजस्थान १ लाख ८५ हजार ५३ रुपये, मध्ये प्रदेश १ लाख ५२ हजार ६१५ तर उत्तर प्रदेशचे दरडोई उत्पन्न १ लाख ८ हजार ९०६ रुपये एवढे आहे..पीकविम्याची आकडेवारी उपलब्ध नाही२०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी एक रुपयातील पीकविमा योजना बंद करून शेतकरी हिश्शाचा विमा भरून घेत सुधारित पीकविमा योजना अमलात आणली होती. एक कोटी ८ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. ६९.८२ लाख हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रासाठी ३६२३०.६६ कोटी विम्याची रक्कम होती. त्यापोटी २४५४.२५ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला. मात्र डिसेंबरअखेर नुकसानभरपाईसाठी प्रस्तावित शेतकऱ्यांची संख्या किती, शेतकऱ्यांना किती भरपाई मिळाली, प्रस्तावित भरपाई किती आणि प्रत्यक्ष भरपाई किती मिळणार याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे अहवालात म्हटले आहे..आज अर्थसंकल्प : कृषी, उद्योग विकासाचा दर तसेच औद्योगिक गुंतवणूक, पायाभूत क्षेत्राचे चित्र स्पष्ट करणारा राज्याचा २०२५-२६ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी (ता. ५) राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. ६) मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. तत्पूर्वी आर्थिक पाहणी अहवालात राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे चित्र समोर आल्याने महायुती सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे..दुग्ध उत्पादनात वाढ; संकलनात मात्र घटमहाराष्ट्रामध्ये २०२३-२४ मध्ये १६०.४५ लाख टन दुधाचे उत्पादन होत होते. २०२४-२५ मध्ये हे उत्पादन १६६.२६ लाख टन झाले. २०२५-२६ मध्ये डिसेंबरपर्यंत सहकारी दूध संघांचे दैनंदिन दूध संकलन ४२.८७ लाख लिटर होते. २०२४-२५ मध्ये मात्र ते ४३.३७ लाख लिटर होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.