Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Sale : कृषी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कपाशी बियाणे विक्रीचे नियोजन

Cotton Seed : राज्यात कापूस पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ४० लाख २० हजार हेक्टर आहे.कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रतिहेक्टर ४.२ पाकिट बियाण्याची आवश्यकता असते.

Team Agrowon

Hingoli News : कपाशीच्या बियाण्याची जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहायकांच्या मदतीने संबंधित कपाशीचे बियाणे वाटप कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. राज्यात कपाशीचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये असे आवाहन कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी केले आहे.

राज्यात कापूस पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ४० लाख २० हजार हेक्टर आहे.कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रतिहेक्टर ४.२ पाकिट बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्राकरिता १ कोटी ७० लाख बियाणे पाकीटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता साधारणपणे १ कोटी ७५ लाख बियाणे पाकिटे उपलब्ध आहेत.

राज्यात कपाशीच्या बियाण्याची कमतरता नाही. शेतकऱ्यांकडून कपाशीच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. इतर कंपन्यांचे कपाशीचे वाण सुद्धा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. कपाशीच्या ठरावीक वाणांचीच मागणी करु नये. केंद्र सरकारने खरीप २०२४ साठी कपाशी बीजी-II बियाणे पाकिटांचा दर ८६४ रुपये निश्‍चित केला आहे.

कपाशीचे बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कपाशी बियाणे उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कपाशी बियाणे पाकिटांची जादा दराने विक्री केल्यामुळे जळगाव, धुळे व छत्रपती संभाजीनगर येथे विक्रेत्यांवर कृषी विभागामार्फत गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यात एच. टी. बीटी कपाशी बियाणेप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ४ हजार ५६८.३० किलो बियाणे साठा जप्त करण्यात आले असून, त्याचे मूल्य ६६ लाख ८५ हजार रुपये इतके आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले.

नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत तीन ठिकाणच्या कारवाईत १ हजार ८०७ एच. टी. बीटी कपाशी बियाणे पाकिटे ३७ लाख ९६ हजार रुपये लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी ११३ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्याचे मूल्य १ लाख ५५ हजार रुपये इतके आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांमार्फत मोहीम स्वरूपात तपासण्या करण्यात आल्या असून, त्यानुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT