Phule Pallavi Tur Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Variety : फुले पल्लवी तुरीचा वाण प्रसारित

Phule Pallavi Tur Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने फुले पल्लवी हा (१२-१९-२) तुरीचा नवीन सुधारित वाण विकसित केला आहे. विद्यापीठाने विकसित केलेला हा तुरीचा वाण आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेल्या फुले पल्लवी या (१२-१९-२) तुरीच्या नवीन वाणाला कानपूर (हैदराबाद) येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकीत मान्यता देऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने फुले पल्लवी हा (१२-१९-२) तुरीचा नवीन सुधारित वाण विकसित केला आहे. विद्यापीठाने विकसित केलेला हा तुरीचा वाण आहे. कानपूर (हैदराबाद) येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य वार्षिक संशोधन कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेत देशभरातील नवीन वाणांच्या प्रसारणाला मान्यता देण्यात आली. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले पल्लवी (१२-१९-२) या मध्यम पक्वता वाणाला मान्यता देण्यात आली. हा वाण देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत लागवडीकरिता शिफारस करण्यात आली असल्याने त्याची लागवड करता येणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली फुले पल्लवी (फुले तूर १२-१९-२) हा वाण विकसित करण्यामध्ये पीक पैदासकार तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. कुटे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, तूर रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही. ए. चव्हाण आणि तूर कीटकशास्त्रज्ञ डॉ. सी. बी. वायळ या शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

वाणांचे वैशिष्ट्ये

फुले पल्लवी या वाणाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन २१.४५ क्विंटल उत्पादन निघते. दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. १०० दाण्यांचे वजन ११.० ग्रॅम भरते. तूर पिकातील मर व वांझ या प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे. शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT