pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

pomegranate: डाळिंबातील सूत्रकृमी व्यवस्थापन

या सूक्ष्म जीवांचा वापर वर्षातून दोनदा (- बाग विश्रांतीवर सोडताना आणि बहर नियमनाच्या वेळी) करावा. त्यामुळे झाडांची अन्नद्रव्ये घेण्याची क्रिया, झाडाची वाढ रोगांप्रति जैव-रासायनिक (Bio-Chemical) प्रतिकारक्षमता सुधारते.

Team Agrowon

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. सोमनाथ पोखरे

सूत्रकृमीचा अधिक प्रादुर्भाव हा झाडाच्या ड्रिपर खाली असलेल्या मुळावरील गाठींवरून स्पष्ट होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक फॉर्मुलेशन उपयोगी ठरतात. उदा. पॅसिलोमायसेस किंवा सुडोमोनास किंवा ट्रायकोडर्मा स्पेसीज. शाश्वत सूत्रकृमी व्यवस्थापनाकरिता या जैविक घटकांचा वापर लागवडीपासून दर सहा महिन्यातून एकदा वापर करावा.

या सूक्ष्म जीवांचा वापर वर्षातून दोनदा (- बाग विश्रांतीवर सोडताना आणि बहर नियमनाच्या वेळी) करावा. त्यामुळे झाडांची अन्नद्रव्ये घेण्याची क्रिया, झाडाची वाढ रोगांप्रति जैव-रासायनिक (Bio-Chemical) प्रतिकारक्षमता सुधारते. तसेच डाळिंबातील मर रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळते.

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास विश्रांती काळात किंवा बहर नियमनाच्या वेळी या प्रमाणे वर्षातून दोनदा पुढील उपाययोजना कराव्यात. त्यामुळे फळांमध्ये अवशेष (रेसिड्यू) न राहता मुळावर गाठी करणारे सूत्रकृमींची (रूट नॉट नेमॅटोड) संख्या नुकसान पातळीपेक्षा कमी राहते.

१) दाणेदार सूत्रकृमीनाशक फ्ल्युएनसल्फोन (२% जीआर) चे ड्रेचिंग करावे. वापरण्यासाठी ड्रिपरच्या खाली एक छोटा खड्डा (५-१० सेंमी) तयार करावा. प्रति ड्रिपर १० ग्रॅम दाणेदार रसायन वापरावे. (मात्र कमाल वापर ४० ग्रॅम प्रति झाडपेक्षा जास्त नसावा.) त्यानंतर ते मातीने झाकून घ्यावे. पाणी देण्यास सुरुवात करावी.

२) याव्यतिरिक्त फ्ल्युओपायरम ४०० एससी (३४.४८% ) २ मिलि प्रति झाड या प्रमाणे सूत्रकृमीनाशकाचेही ड्रेचिंग करता येते. ते करण्यापूर्वी आदल्या दिवशी झाडांना पुरेसे पाणी द्यावे. दोन लिटर पाण्यात २ मिलि मिसळावे. हे द्रावण प्रति ड्रिपर ५०० मिलि (४ ड्रिपर प्रति झाड असल्यास) किंवा १००० मिलि प्रति ड्रिपर (२ ड्रिपर्स प्रति झाड असल्यास) द्यावे.

डॉ. सोमनाथ पोखरे, ९९२२१००४०१

(शास्त्रज्ञ- सुत्रकृमीशास्त्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: कोकणात उन्हाचा चटका; राज्यात तापमानाचा पारा तिशीपार

Lok Sabha adjourned: विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, अध्यक्षांचा निर्णय; लोकसभेचे कामकाज ९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब

Summer Sesame Sowing: उन्हाळी तीळ पेरणीची लगबग सुरू

Punjabrao Deshmukh Hostel Allowence Scheme: गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा खर्चासाठी मदत; पाहूयात डॉ. पंजाबराव देशमुख योजनेची A ते Z सविस्तर माहिती

Water Scarcity: पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT