Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा प्रश्नी लोकप्रतिनिधींना गावबंदी

Crop Insurance Compensation : पीकविमा योजनेत फसवणूक झाल्याच्या भावनेतून चिनावल (ता. रावेर) येथील ग्रामस्थांनी आमदार, खासदार- मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पीकविमा योजनेत फसवणूक झाल्याच्या भावनेतून चिनावल (ता. रावेर) येथील ग्रामस्थांनी आमदार, खासदार- मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला आहे. तसेच पीकविमा योजनेत मदत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.

सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे वारे वाहू लागले असताना केळी उत्पादकांना पीकविम्यांची रक्कम न मिळाल्याच्या कारणावरून खानदेशातील ग्रामीण भागातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चिनावल येथील सुमारे दोनशे हेक्टर केळी क्षेत्रांवर केळी उत्पादकांनी पीकविमा घेऊनही केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची या भागातील शेतकऱ्यांची भावना आहे.

तरुण शेतकरी आक्रमक

रोषात तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत विमा कंपनी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांबाबत अनास्था दाखवत असल्याबद्दल रोष व्यक्त केला व गावात येणाऱ्या‍ प्रमुख रस्त्यावर गावबंदीचे फलक लावण्यात यावे. असे ठरले. चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी विमा घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे विमा कंपनी निकषानुसार नुकसान होवूनही भरपाई मिळत नसल्याने विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आमदार, खासदार व मंत्री ना गावबंदी झालीच पाहिजे व मतदानावर बहिष्कार अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पीकविमा योजनेत केळी उत्पादकांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळाला पाहिजे. ही प्रमुख मागणी आहे, अशी मागणी करण्यात आली.

मदत नाही, दौरे नाहीत...

कंपनीच्या निकषानुसार सदर शेतकरी विमा मिळण्यास पात्र असतानाही दिवाळीआधी ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना, अजूनही मिळाली नसल्याने आज चिनावल येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत बस स्टँडवर शेकडो शेतकऱ्यांनी बैठक घेत जोपर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही तोपर्यंत चिनावल येथे कोणताही मंत्री, आमदार, खासदार यांना पूर्ण गावबंदी करण्याचा ठराव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT