Crop Insurance : परभणीत पीकविमा दाव्याच्या ४३ हजारांवर पूर्वसूचना नामंजूर

Crop Damage Intimation : २०२३ च्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : २०२३ च्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलॅमिटीज) या जोखीम बाबींअंतर्गंत पीकविमा भरपाई मिळण्यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी ८३ हजार ३१ पूर्वसूचनाद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे सादर केली.

त्यापैकी ३९ हजार १२९ पूर्वसूचना मंजूर तर ४३ हजार ०९२ पूर्वसूचना नामंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. ता. २७ नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात सरासरी ६५ मिलीमीटर पाऊस झाला.

परभणी, जांब, झरी, सिंगणापूर, पिंगळी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, बोरी, आडगाव बाजार, चारठाणा, वाघी धानोरा, दूधगाव, देऊळगाव, कुपटा, कोल्हा, ताडबोरगाव, कासापुरी पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा या २३ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

Crop Insurance
Advance Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात १३० कोटी १० लाखांचा अग्रिम विमावाटप

वादळी वाऱ्यामुळे तुरीचे पीक आडवे झाले. नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पिकांमध्ये शिरले. वेचणी राहिलेला कापूस गळून पडला. भिजल्याने प्रत खराब झाली. त्यानंतरचे दोन दिवस पाऊस सुरुच राहिल्यामुळे पीकनुकसानीत वाढ झाली. परभणी जिल्ह्यात यंदा (२०२३) च्या खरिपात तुरीची ३७ हजार हेक्टर पेरणी झाली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक नुकसानीपोटी हरियाणा सरकारची शेतकऱ्यांना ३१ कोटींची विमा भरपाई

शेतकऱ्यांनी ९७ हजार ६१७ प्रस्तावाव्दारे ३४ हजार ९९ हेक्टरवरील तूर पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ हेक्टरवर लागवड आहे. शेतकऱ्यांनी १ लाख ४१ हजार ९९६ प्रस्तावांद्वारे ७९ हजार ३२४ हेक्टरवरील कपाशीचे पीक विमा संरक्षित केले आहे. शेतकऱ्यांनी विविध माध्यमातून पीकनुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीकडे सादर केल्या आहेत.

पंतप्रधान पीकविमा खरीप पीकविमा पूर्वसूचना स्थिती

तालुका मंजूर पूर्वसूचना नामंजूर पूर्वसूचना एकूण पूर्वसूचना

परभणी ३५८६ ५८४६ ९४३२

जिंतूर ७४४१ १११२० १८५६१

सेलू ३३८० ५५११ ८८९१

मानवत १७८१ १६२५ ३४०६

पाथरी ३३९९ २६३१ ६०३०

सोनपेठ ७०१ १५९६ २२९७

गंगाखेड ४९९८ ४९५१ ९९४९

पालम ५३९७ ४२३६ ९६३३

पूर्णा ८४४६ ६३८२ १४८२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com