Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Pending Insurance Compensation : प्रलंबित विमा भरपाई ६ जिल्ह्यांसाठी मंजूर

Team Agrowon

Pune News : राज्यातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ मधील पीक विम्याचे प्रलंबित १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत. यात नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

राज्यात पीकविमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ रबविण्यात येत आहे. बीड पॅटर्ननुसार विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त आल्यास ११० टक्क्यांपर्यंत विमा भरपाई विमा कंपनी देते, तर त्यापुढची भरपाई राज्य शासन देते. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई यंदा ११० टक्क्यांपेक्षा जास्त आली होती.

ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई एकूण विमा हप्त्याच्या २०० ते ३०० टक्क्यांपर्यंत आली होती. त्यामुळे विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा पुढची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी या विमा कंपनीने केली होती. ओरिएंटल विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी एकूण १ हजार २५५ कोटी रुपये मिळाले होते. पण या कंपनीकडे विमा भरपाईची रक्कम ३ हजार ३०७ कोटी रुपये आली होती. विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांप्रमाणे विमा कंपनीकडे भरपाईची रक्कम १ हजार ३८० कोटी रुपये आली होती. तर ११० टक्क्यांपेक्षा पुढची सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपये भरपाई आली होती.

कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडे १ हजार ९२७ कोटी रुपयांची मागणी केली होती. आता राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिली आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

खरिपातील विमा भरपाई

मागील हंगामात दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये विक्रमी विमा भरपाई मिळाली. शेतकऱ्यांना एकूण ७ हजार ६२१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी विमा कंपन्यांनी आतापर्यंत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता आणखी १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत.

जिल्हानिहाय मंजूर भरपाई

सरकारने सहा जिल्ह्यांसाठी १ हजार ९२७ कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ६५६ कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यात ४७० कोटी रुपये कोटी, नगर जिल्ह्यात ७१३, सोलापूर जिल्ह्यात २.६६ कोटी, सातारा जिल्ह्यात २७.७३ कोटी आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५८.९० कोटी रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे.

शासनाने ३० सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये १ हजार ९२७ कोटी रुपये प्रलंबित रक्कम मंजूर केली. ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
विनयकुमार आवटे, कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Bribe Case : शेतीच्या कामासाठी मंडल अधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना अटक

Anandacha Shidha Ration : ‘आनंदाचा शिधा’ अडकला तेलात; कोल्हापुरातील लाभार्थ्यांना प्रतीक्षा

PM Kisan Yojana : पीएम किसान १८ व्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार शेतकरी राहणार वंचित

Safflower Farming : जिरायती क्षेत्रासाठी करडई फायदेशीर

Livestock : राज्यातील शेळी, मेंढी, अश्व संपदा

SCROLL FOR NEXT