Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pumps : परभणीत कृषिपंपाच्या दोन हजारांवर जोडण्या प्रलंबित

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ अखेर कृषिपंपाच्या २ हजार २४२ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत ६ हजार ८४४ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांची प्रतीक्षा आहे.

परभणी जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ अखेर महावितरणअंतर्गत कृषिपंप वीजग्राहकांची संख्या ९९ हजार ९९८ आहे ३१ मार्चअखेर सुरक्षा अनामत रक्कम भरून कृषिपंपांच्या वीज जोडणी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या ३ हजार ५०५ होती.

२०२३-२४ मध्ये जिल्ह्यात १ हजार २३६ कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून २ हजार २४२ (३८.८५ टक्के) जोडण्या प्रलंबित आहेत. लघुदाब कृषिपंपांसाठी ४ हजार ५६८ शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यापैकी १ हजार २६३ जोडण्या दिल्या असून ३ हजार ३०५ कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित आहेत.

२०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ५ हजार ५९२ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत ८ हजार ४४० शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरली त्यापैकी १ हजार ६०० सौर कृषिपंप बसविण्यात आले. अद्याप ६ हजार ८४४ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांची प्रतीक्षा आहे.

परभणी जिल्हा कृषिपंप वीज जोडणी स्थिती

तालुका कृषिपंप ग्राहक वीजजोडणी अर्ज जोडणी दिलेले कृषिपंप प्रलंबित जोडण्या

परभणी १८५९६ ४११ १२१ २९०

जिंतूर १८७१३ ७६० ३५४ ४०६

सेलू १११३३ ३२७ १२७ २००

मानवत ८१८२ २९६ ८५ २११

पाथरी १०९२४ ४६९ २३१ २३८

सोनपेठ ५०६१ १७७ ७४ १०३

गंगाखेड ९३९९ ३९६ १३० २६६

पालम ६७०८ २०१ १२० ८१

पूर्णा ११२८२ ४६८ २१ ४४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT