Agriculture Pumps : कृषिपंपांच्या ४ हजारांवर जोडण्या प्रलंबित

Agriculture Pumps Connection Pending : हिंगोली जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ अखेर कृषी पंपांच्या ४ हजार ३६१ वीज जोडण्या प्रलंबित आहेत.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ अखेर कृषी पंपांच्या ४ हजार ३६१ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. रोहित्रापासून २०१ ते ६०० मीटर अंतर असलेल्या अनामत रक्कम भरलेल्या ३ हजार ७९९ कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी १३ कोटी ४१ लाख रुपये निधीची गरज आहे. पीएम कुसुम टप्पा क्रमांक २ अंतर्गत २ हजार ८६७ सौर कृषिपंपांची कामे प्रलंबित आहेत.

Agriculture Pump
Agricultural Pump Seized : पाचोरा केटी वेअर बंधाऱ्यातून शेतीपंप जप्त

जिल्ह्यात ३१ मार्च २०२३ अखेर महावितरण अंतर्गत कृषिपंप वीजग्राहकांची संख्या ७९ हजार ३७२ आहे, तर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ४ हजार ९८२ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. १ एप्रिल अखेर सुरक्षा अनामत रक्कम भरून कृषिपंपांच्या वीज जोडणी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या ४ हजार ८९५ होती.

Agriculture Pump
Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ

२०२३-२४ मध्ये जिल्ह्यात १ हजार ८०० कृषिपंपांच्या वीज जोडण्या देण्यात आल्या, तर ‘पीएम कुसुम टप्पा २’ अंतर्गत ८९२ सौर कृषिपंप बसविण्यात आले. अजून ४ हजार ३६१ कृषिपंपांच्या वीजजोडण्या तसेच २ हजार ८६७ सौर कृषिपंप बसविण्याची कामे प्रलंबित आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंप वीज जोडणी

तालुका कृषिपंप पीएम कुसुम सौर कृषिपंप

हिंगोली १२७४ ५२२

कळमनुरी ९०५ २३०

वसमत ६१६ १४३०

औंढा नागनाथ १५८ ११४

सेनगाव १४०८ ५७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com