Maharashtra Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Assembly Election : सांगलीत चुरशीने मतदान

Maharashtra Election 2024 : आठही विधानसभा मतदार संघांत चुरशीने मतदान झाले. मतदान करण्यासाठी गर्दीही वाढू झाली.

Team Agrowon

Sagli News : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांसाठी २ हजार ४८२ मतदान केंद्रावर बुधवारी (ता. २०) किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ६३.२८ टक्के मतदान झाले. आठही विधानसभा मतदार संघांत चुरशीने मतदान झाले. मतदान करण्यासाठी गर्दीही वाढू झाली.

जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार आहेत. सकाळी सात वाजता मतदान प्रकिया सुरू झाली. नऊपर्यंत संथ गतीने मतदान सुरू होते. नऊनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. ग्रामीण भागामध्येसुद्धा मतदान करण्यासाठी तरुण पुढे आले. विविध मतदान केंद्रांवर महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

विविध पक्षांच्या बूथवर कार्यकर्त्यांचीही वर्दळ दिसून येत होती. एकूणच मतदारांमध्ये दुसऱ्या टप्प्यात उत्साह दिसून आला. विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. शिराळा मतदार संघामधील बहुतांश मतदार हे मुंबईत कामानिमित्त आहेत. मतदानासाठी मुंबईवरून मतदान केंद्रावर येऊ लागले होते.

जिल्ह्यात २ हजार ४८२ मतदान केंद्रांत मतदान सुरू आहे. सकाळी विटा शहरातील आणि सांगली शहरातील दोन केंद्रांमध्ये मतदान यंत्रामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाला असल्याने यंत्रे बदलण्यात आली. दुपारनंतर यंत्रामध्ये कसलाही तांत्रिक बिघाड झाला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली.

दुपारनंतर काही मतदान केंद्रांवर लोकांची गर्दी कमी झाल्याने मतदान प्रक्रिया काहीशी मंदावली होती. मात्र शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्रावर भर दुपारी ही गर्दी असल्याचे चित्र होते. उत्साही मंडळी मतदान केल्याची खूण दाखवत सोशल मीडियावर ‘तुम्ही मतदान केले का?’ असे विचारत मतदान करण्याचे आवाहन करत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price: दिवाळीत शेतकऱ्यांना मोठी भेट, हरियाणा सरकारने जाहीर केला देशातील सर्वाधिक ऊस दर

Soybean MSP: हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेला विलंब 

Indian Economy: भारतीय बाजारपेठेच्या शक्तीची झलक

Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा

SCROLL FOR NEXT