Nanded News : बुधवारी सकाळी सात वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रांवर मतदाराच्या रांगाच रांगा दिसून आल्या आहेत. जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४२.८७ टक्के मतदान झाले, तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ४१.५८ टक्के मतदान झाले. नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघासाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी निघालेल्या मतदारांत उत्साह दिसून आला. नव्याने मतदान करणारे नवतरुण, तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग नोंदविला. मतदानाबाबत तुरळक तक्रारी वगळता जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत शांततेत मतदान झाले. यानंतरही जिल्ह्याच्या सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा आहेत.
मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी पाचनंतरही अनेक ठिकाणी मतदान होईल अशी शक्यता मतदान प्रतिनिधींनी व्यक्त केली. दुपारी तीनपर्यंत जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात झालेले मतदान. किनवट मतदार संघात ४८.९४ टक्के, हदगाव मतदार संघात ४८.२९ टक्के, भोकर मतदार संघात ४४.७२ टक्के , नांदेड उत्तर ३९.४० टक्के, नांदेड दक्षिण मतदारसंघ ३८.८४ टक्के, लोहा मतदारसंघात ४०.१० टक्के, नायगाव मतदारसंघात ४७.६५ टक्के, देगलूर मतदारसंघात ४२.१६ टक्के, मुखेड मतदारसंघात ३७.१२ टक्के मतदान झाले आहे.
जिल्हा दुपारी तीनपर्यंत मुखेड विधानसभा मतदारसंघात मतदान धीम्या गतीने सुरू होते. किनवट विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण चांगले होते. दुपारी तीन नंतर विधानसभा मतदार संघासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याच्या दिसून आल्या. यावेळी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ४१.५८ टक्के मतदान
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक या वेळी विधानसभा निवडणुकीसोबत झाली. नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागले. दुपारी तीनपर्यंत लोकसभा मतदारसंघासाठी ४१.५८ टक्के मतदान झाले. मतदारांना एकाच वेळी दोन वेळा मतदान करावे लागल्याने मतदानाची गती थोडी मंदावली होती. दरम्यान, दुपार तीननंतर अनेक मतदारसंघात मतदारांच्या रांगेत दिसून आल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.