PDKV Akola  Akola
ॲग्रो विशेष

PDKV Akola : पीडीकेव्हीमध्ये तंत्रज्ञानासह यंत्र प्रात्यक्षिक मेळावा

Agri-Technology डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि यंत्र प्रात्यक्षिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि यंत्र प्रात्यक्षिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी व कृषी आधारित उद्योगांसाठी ऊर्जा, कृषी अवजारे व यंत्रे आणि कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान या तिन्ही योजनांच्या संयुक्तपणे हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, विभागप्रमुख डॉ. प्रमोद बकाने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रास्ताविकात डॉ. काळबांडे यांनी शेतकऱ्यांना या मेळ्याचे महत्त्व सांगितले. तसेच काही प्रगतिशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा सांगून उपस्थित शेतकऱ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

डॉ. खर्चे म्हणाले, सध्या शेतीला जोडधंद्याची नितांत गरज असून प्रत्येक शेतकऱ्याने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. श्री. देशमुख यांनी कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी अध्यक्षीय भाषणात शेतीमधील काही उद्योगांची उदाहरणे देऊन शेतीमधील उद्योग हा शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आणि आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT