Desi Cotton Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cotton Variety : कपाशीचा ‘पीडीकेव्ही धवल’ देशी वाण राष्ट्रीय स्तरावर

Crop Variety : यात कपाशीच्या पाच वाणांचा समावेश असून त्यात अकोल्यातील विद्यापीठाच्या देशी कपाशीच्या सुधारीत वाणालाही स्थान मिळाले.

 गोपाल हागे

Akola News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. ११) प्रसारित केलेल्या देशभरातील हवामान अनुकूल विविध पिकांच्या वाणांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधित केलेला ‘पीडीकेव्ही धवल’ हा देशी कपाशीचा सुधारीत वाणही प्रसारित करण्यात आला.

पंतप्रधानांनी देशातील विविध विद्यापीठ, संस्थांनी शोधलेल्या १०९ वाणांचे प्रसारण केले. यात कपाशीच्या पाच वाणांचा समावेश असून त्यात अकोल्यातील विद्यापीठाच्या देशी कपाशीच्या सुधारीत वाणालाही स्थान मिळाले.

कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात कापूस संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञांनी कोरडवाहू क्षेत्रासाठी देशी कपाशीचा सुधारीत वाण ‘पीडीकेव्ही धवल’ हा २०२२ मध्ये प्रसारित केला होता.

आता पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर हा वाण अधिसूचित झाल्याने बियाणे प्रसाराचे काम सुरू होणार आहे. या कपाशी वाणाचे कोरडवाहू भागात हेक्टरी १५ ते १६ क्विंटल उत्पादन मिळू शकते.

प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील कोरडवाहू क्षेत्रासाठी हा वाण प्रसारित करण्यात आलेला आहे. हवामान अनुकूल असल्याने हा देशी कपाशीचा वाण पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम आहे. शिवाय रसशोषक किडींना सहनशील आहे.

मध्यम धाग्याचा वाण असून धाग्याची लांबी साडेचोवीस ते २५ मिलिमीटर मिळते, अशी माहिती कापूस विभागाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. देशमुख यांनी दिली. कोरडवाहू शेतकऱ्यांना हवामान अनुकूल असलेला हा वाण एक पर्याय म्हणून येत्या काळात उपलब्ध होणार आहे.

सध्या हवामान बदलाच्या काळात शेतकरी केंद्रस्थानी ठेवत विद्यापीठ शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना काय हवे याची जाणीव ठेवत कोरडवाहू क्षेत्रासाठी देशी कपाशीचा हा सुधारीत वाण ‘पीडीकेव्ही धवल’ निश्‍चितच फायदेशीर ठरेल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Anudan : शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा; अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Electric Tractors in Agriculture: शेतीत आता आवाज, धूर निघणार नाही, खर्चही कमी, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे काय आहेत फायदे?

Unseasonal Rain : रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून रोजगाराची हमी

Crop Management: अवकाळी पावसानं भातशेती संकटात; 'या' उपाययोजना केल्यानं उत्पादनातील घट टाळता येईल

SCROLL FOR NEXT