PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

NABARD Award : ‘पीडीसीसी’ बँकेस ‘नाबार्ड’चा उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार

PDCC Bank : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) स्थापना दिनानिमित्त राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्कार देण्यात आले.

Team Agrowon

Pune News : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) स्थापना दिनानिमित्त राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (पीडीसीसी) केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी स्वीकारला.

‘नाबार्ड’चा ४४ वा स्थापना दिवस व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ याचे औचित्य साधून केंद्रीय सहकार तथा नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १९) स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम झाला. पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये केलेले कामकाज विचारात घेता ‘नाबार्ड’ने गुणवत्तेच्या आधारे राज्यातील ‘बेस्ट परफॉर्मन्स इन डीसीसी’ बँक म्हणून ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस’ गौरविण्यात आलेले आहे. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची व्यावसायिक उलाढाल असणारी व पहिल्या ५ क्रमांकांमध्ये असणाऱ्या अर्बन शेड्यूल्ड सहकारी बँकांशी तुलना करता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अग्रगण्य स्थान प्राप्त केलेले आहे.

बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एनपीए वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो इत्यादी सर्व आघाड्यांवर ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये २२.१० टक्के इतकी वाढ झालेली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी १४,७६७ कोटी, कर्ज १२,०५९ कोटी, एकूण व्यवसाय उलाढाल २६,८२६ कोटी रुपये, निव्वळ एनपीए शून्य टक्के व सर्व २९४ शाखा नफ्यामध्ये आहेत.

तसेच बँकेच्या संलग्न विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासदांच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील व्याज सवलत व व्याज परताव्याची माहिती केंद्र शासनाच्या के.आर.पी. पोर्टलमध्ये मुदतीत सादर करणारी राज्यातील एकमेव ‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ म्हणून देश पातळीवर गौरविण्यात आलेले आहे.

बँकेच्या या कामगिरीमध्ये बँकेचे ग्राहक, शेतकरी, सभासद, संचालक मंडळ तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान असून या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग अधिक उत्साहाने कामकाज करतील व बँकेच्या नावलौकिकास वाव मिळेल.
- अनिरुद्ध देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Logistic Parks: राज्यात ५ ॲग्री लॉजिस्टिक पार्क

Monsoon Session of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे : पंतप्रधान मोदी

Orange Price: यंदाच्या हंगामात आंबिया बहरातील संत्रा खाणार भाव

Crop Insurance Scheme: कंपन्यांना आठ वर्षांत साडेदहा हजार कोटी नफा

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

SCROLL FOR NEXT