PDCC Bank Bharti 2025 : ‘पीडीसीसी’ बँकेत एक हजार जागांची भरती

Cooperative Bank Recruitment : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार विभागाने या नोकरभरतीस परवानगी दिली आहे.
PDCC Bank
PDCC BankAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार विभागाने या नोकरभरतीस परवानगी दिली आहे. त्यानुसार शासकीय पॅनेलवर संस्थेच्या मार्फतच नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येत्या २० ते २५ दिवसांत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र त्या वेळी आगामी बँकेच्या निवडणुका, तसेच लांबणीवर पडलेल्या निवडणुका यांमुळे निवडणुका प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला.

PDCC Bank
PDCC Bank : ‘पीडीसीसी’ बँकेकडून ३० लाख नागरिकांना बँकिंग सुविधा

मात्र याच दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकरभरती करायची असेल, तर त्यासाठी पॅनेल निश्‍चित केले. याच पॅनेलवरील संस्थांकडून नोकरभरती करण्याचे बंधन शासनाने घातले.

PDCC Bank
PDCC Bank: ‘पीडीसीसी’ बँकेला यंदा ७५ कोटींचा निव्वळ नफा

यासंदर्भात बँकेने सहकार विभागाने यासंदर्भातील अभिप्राय मागविला असता, सहकार विभागानेसुद्धा पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी, असे नमूद केले.

जिल्हा बँकेत लिपिक व अन्य अशा सुमारे नऊशे ते एक हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया २० ते २५ दिवसांत सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com