Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : विमा भरपाई द्या, अन्यथा कृषी कार्यालयाला टाळे ठोकू

Crop Insurance Scheme : हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांनी आंबा, काजू फळबागांचे क्षेत्र संरक्षित केले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना अद्याप विमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे उत्पादक आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असून १ नोव्हेंबरपूर्वी परतावा मिळाला नाही तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांनी आंबा, काजू फळबागांचे क्षेत्र संरक्षित केले. १ नोव्हेंबर ते १५ मे असा संरक्षित कालावधी होता. यावर्षी सतत ढगाळ वातावरण, तापमान वाढ, अवकाळी पाऊस, याशिवाय विविध नैसर्गिक आपत्तींमुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे विमा कंपन्यांकडून यावर्षी वेळेत भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. जोखीम कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत विमा भरपाई बागायतदारांना मिळणे आवश्यक होते. परंतु अद्याप भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात यापूर्वी विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन छेडले होते. याशिवाय शिवसेनेने (उबाठा) देखील आंदोलन छेडले होते.

मात्र शासनाकडून विमा कंपनीला देण्यात येणारी ५३ कोटी रुपयांची रक्कम न भरल्यामुळे ही भरपाई अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता आंबा, काजू बागायतदार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

नवीन विमा संरक्षित कालावधी १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बागायतदारांना अद्याप मागील भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपूर्वी भरपाई मिळाली नाही तर १ नोव्हेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बदलत्या वातावरणामुळे कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नव्या उमेदीने नवीन हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. त्या शेतकऱ्याला वेळेत विमा भरपाई मिळणे आवश्यक होते. परंतु तशा प्रकारची कोणतीही कार्यवाही शासन पातळीवरून होताना दिसत नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरला आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकून शासनाचे लक्ष वेधणार आहोत.
- सतीश सावंत, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT